तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जल आणि वायू प्रदूषण होत असल्याने कारखानदारांना राष्ट्रीय हरित लवादाने सुमारे १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. मात्र त्यानंतर ही तळोजातील प्रदूषण संपले नसल्याने पुन्हा कारखानदारांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमांचा फास आवळला आहे. या अशा स्थितीत उद्योग चालवायचे की न केलेल्या प्रदूषणाचा दंड भरायचा या विवंचनेत असणाऱ्या तळोजातील उद्योजकांनी थेट प्रदूषण करणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली.

हेही वाचा- नव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांसाठी झटणा-या टीएमए या संघटनेच्या काही जागरुक पदाधिका-यांनी गेल्या आठवडाभरात पुढाकार घेऊन तळोजा औद्योगिक क्षेत्रातील तीन वेगवेगळ्या ठिकाणचे प्रदूषण करताना रंगेहाथ छायाचित्रीकरण केले. त्यानंतर ते छायाचित्रण प्रसार माध्यमांमध्ये जाहीर केले. यामध्ये व्हीव्हीएफ कंपनीच्या समोरील मोकळ्या जागेत तर रस्त्याकडेला रसायनयुक्त टॅंकर धुण्याचे आणि सिडको नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून घोटनदीत जाणारा सांडपाण्याचे पुरावेच जाहीर केल्याने प्रदूषणाचा अवैध व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा- राज्यातील पाऊस यंदा सरासरीपुढेच; कोकणात प्रमाण कमी; विदर्भ, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक

टीएमएचे अध्यक्ष शेखर शृंगारे यांनी या शोध मोहीमेत कोणकोणते उद्योजक आहेत याची माहिती देण्यास नकार दिला. मात्र, नाहक उद्योजक या अवैध व्यवसायामुळे भरडले जात असल्याची व्यथा मांडली. ज्या यंत्रणेने हे अवैध व्यवसायीकांवर निर्बंध लावण्यासाठी सरकारने नेमले अशा यंत्रणेच्या अधिका-यांनी सातत्याने कारवाई केल्यास उद्योजक व पर्यावरणावर ही वेळ येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.