scorecardresearch

नवी मुंबई : कलिंगडची मागणी वाढल्याने दरवाढ

वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात रसरशीत लाल रंगाचे कलिंगड मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारत दरवाढ झाली असून, किरकोळ बाजारात नियंत्रण नसल्याने तर लूट केली जात आहे.

watermelon price increase
कलिंगडची मागणी वाढल्याने दरवाढ (image source -pixabay)

नवी मुंबई : उन्हाचा जोर वाढत असताना वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात रसरशीत लाल रंगाचे कलिंगड मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शरीराला थंडावा देणारी कलिंगडे बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, चव चाखण्यासाठी मागणीही वाढत आहे. त्यामुळे घाऊक बाजारत दरवाढ झाली असून, किरकोळ बाजारात नियंत्रण नसल्याने तर लूट केली जात आहे.

घाऊक बाजारात ४०-५० गाड्या अशी ९ हजार ३२० क्विंटल कलिंगडची आवक झाली असून, प्रतिकिलो १० रुपये ते १५ रुपये, तर किरकोळ बाजारात प्रतिनग ७० रुपये ते १०० रुपये बाजारभाव आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगडे दाखल होण्यास सुरुवात होते. तर मार्चपासून त्याच्या मागणीत वाढ होते. महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून त्याची आवक होते. सध्या बाजारात शुगरबेबी आणि नामधारी कलिंगड उपलब्ध आहेत. आधी घाऊक बाजारात कलिंगड प्रतिकिलो ८-१० रुपयांनी उपलब्ध होते, परंतु मागणी वाढत असल्याने दरवाढ होत आहे. रमजाननंतर रसाळ फळांची मागणी आणखी वाढणार असून त्यामुळे पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे, असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – उरण – पनवेल मार्गावरील हाईट गेटमुळे अपघातात वाढ; प्रवाशांच्या जिवाला धोका

खरबूजची आवकही वाढली

हेही वाचा – नवी मुंबई : व्यवसायिक वाहनांना वेग नियंत्रक बंधनकारक; वेग नियंत्रकाविना वाहन पासिंग नाही

उन्हाळी वातावरणात खरबूजलाही अधिक मागणी असते. विशेषतः फळ सलादमध्ये कलिंगड व खरबूज हे जास्त प्रमाणात वापरले जातात. एपीएमसी बाजारात दक्षिण सोलापूर, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून २ हजार क्विंटल आवक झाली आहे. घाऊक बाजारात खरबूज प्रतिकिलो २०-२५ रुपये बाजारभावाने विक्री होत आहे. तसेच १ हजार ६२५ किलो पपई आवक झाली असून १५-३० किलो दराने विक्री होत आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 17:16 IST
ताज्या बातम्या