पूर्वी मधसंकलक नसíगक मोहोळांच्या निवासातून (ओंडके, जमिनीतील बिळे, खडकाच्या पोकळ्या) मध गोळा करीत. परंतु मोहोळाच्या निवाऱ्यांच्या शास्त्रीय निरीक्षणांमुळे मोहोळांच्या आतील पोळ्यांची रचना नीट समजली. त्यामुळे व्यापारी पद्धतीच्या मधमाश्यापालनात खास आणि विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटय़ांचा विकास होत गेला.
मोहोळातून मध काढताना माश्यांना न मारता मध कसा गोळा करता येईल, याचे अनेक प्रयत्न झाले. नसíगक पोळ्यांमध्ये मधाची साठवण पोळ्याच्या वरच्या भागात आणि अंडी-अळ्यांचं संगोपन पोळ्याच्या मधल्या भागात केलं जातं. मध शुद्ध स्वरूपात काढायचा असेल तर त्यामध्ये अंडी, अळ्या किंवा प्रौढ माश्यांचे भाग मिसळता कामा नयेत. मधाची मेणाची पोळी न मोडता मध काढता आला पाहिजे. त्यासाठी खास मधसाठवणीचा पोळ्याचा भाग इतर भागांपासून स्वतंत्रपणे हाताळता यायला हवा. ही दृष्टी डोळ्यांसमोर ठेवून मोहोळे ठेवण्याच्या गवती टोपल्या, मातीची मडकी किंवा तत्सम साधनांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेचा विचार सुरू झाला. नसíगक मोहोळात मध साठवण ज्या वरच्या भागात केली जाते, तो भाग मोहोळे ठेवण्याच्या कृत्रिम साधनांमध्ये इतर भागांपासून वेगळा व हाताळणीस सोयीचा व्हावा अशी रचना पुढे आली.
मधमाश्यांच्या मोहोळांवर आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींवर यासाठी नियंत्रण कसे ठेवता येईल, यावर वेगाने संशोधन सुरू झाले. मोहोळामधील मधमाश्यांच्या स्वभावधर्माचा अभ्यास करून मोहोळातील प्रत्येक घटकाच्या दैनंदिन व वार्षकि हवामानबदलांनुसार होणाऱ्या  हालचालींवर, त्यांच्या कामांवर शास्त्रीय पद्धतीने निरीक्षणे नोंदविण्यास सुरुवात झाली. पॅरिस येथील फ्रेंच रॉयल ऑब्झरव्हेटरीमध्ये अशा प्रयोगांसाठी ‘निरीक्षण पेटी’चा वापर केला गेला. हय़ूबर याने पुस्तकाच्या पानांच्या रचनेप्रमाणे एकेक चौकट असलेली पोळी ठेवण्याची निरीक्षण पेटीच तयार केली. अशा अनेक चौकटी बिजागरींच्या साहाय्याने एका कडेने एकमेकीस जोडलेल्या होत्या. ग्रंथांच्या पानांप्रमाणे त्या उघडून आतील पोळ्यांची पाहणी करता येत असे.  त्याचप्रमाणे पेटीतील पोळी स्वतंत्रपणे एकेका आधारपट्टीला खाली लटकत राहतील व ती नसíगक मोहोळाप्रमाणे एकमेकाला चिकटून समांतर राहतील, अशी व्यवस्था असलेल्या निरीक्षण पेटीची निर्मिती झाली.

    

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १ मे
१८६१ > सरकारी शिक्षण संस्थेतर्फे ‘पुणे पाठशाळापत्रक’ हे मासिक सुरू. पुढे ते ‘शाळापत्रक’ या नावाने निघू लागले. १८७५ मध्ये ते बंद पडले.
१९०४ > समीक्षक व जर्मन साहित्याचे अनुवादक नरहर काशीनाथ घारपुरे यांचा जन्म. स्टिफन झ्वाइगच्या लघुकादंबरीचा तसेच नाटकाचा अनुवाद त्यांनी केला, तसेच ‘जर्मन वाङ्मयाचा इतिहास’ मराठीत आणला. ‘समग्र किलरेस्कर’चे सटीक संपादन त्यांनी केले होते.
१९०६ > आद्य हिंदू मिशनरी, सहकार तत्त्वाचे प्रचारक, पैसाफंडाचे जनक आणि लेखक गोविंद बाबाजी जोशी यांचे निधन. ‘हिंदू लोकांस विनंती व वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ’, ‘रायगड जिल्ह्य़ाचे वर्णन’, ‘लाहोरचा प्रवास’, ‘लोक व त्यांच्या समजुती’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९९३ > समाजवादी नेते नारायण गणेश गोरे ऊर्फ नानासाहेब गोरे यांचे निधन. १९४२ च्या चळवळीतील कारावासानंतर ‘कारागृहाच्या भिंती’ हे दैनंदिनीवजा पुस्तक त्यांनी लिहिले. कथा, ललितलेख, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. ‘डाली’, ‘सीतेचे पोहे’, ‘शंख आणि शिंपले’, आणि ‘समाजवादच का?’, ‘भारताची पूर्व सरहद्द’, आदी २५ पुस्तके त्यांनी लिहिली.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                            पित्तविकार : अनुभविक उपचार : ३
अंगास घाण वास- उपळसरी चूर्ण सकाळी, रसायन सायंकाळी; चंदनादि वटी ३ गोळ्या सकाळ-सायंकाळ.
अंगात कडकी – लमावसंत ६, प्रवाळ, लघुसूतशेख प्र. ३ दोनदा. पुरुषांच्या कडकीकरिता वाळा, स्त्रियांकरिता चंदन, बालकांकरिता चंदन ही परमऔषधी. ताजी न मिळाल्यास अनुक्रमे उशिरासव, चंदनासव वा अरविंदासवाचा वापर करावा.
कंठशोष – काळ्या मनुका चावून खाव्या, एलादिवटी चघळाव्या. कुष्मांडपाक किंवा वासापाक ३ चमचे सकाळ-सायंकाळ घ्यावा.
अंग गळून जाणे – चंद्रप्रभा, शृंग प्र. ३ गोळ्या, च्यवनप्राश २ चमचे सकाळ-सायंकाळ घ्यावा.
तोंड आंबट कडू होणे – आरोग्यवर्धिनी ३ गोळ्या सुंठ चूर्ण व गोरखचिंचावले हा बरोबर सकाळ-सायंकाळ; जेवणानंतर आम्लपित्त टॅबलेट ३ गोळ्या; झोपताना त्रिफळा चूर्ण घेणे.
तेज नकोसे होणे – शतावरी घृत २ चमचे किंवा शतावरी कल्प ३ चमचे सकाळ-सायंकाळ दुधाबरोबर घ्यावा. तळपायास शतधौतघृत चोळावे. रात्रौ निद्राकरवटी ६ गोळ्या घ्याव्या.
सतत थंड हवेसे वाटणे – प्रवाळ, कामदुधा प्र. ३ गोळ्या कुष्मांडपाकाबरोबर दोन वेळा घेणे.
त्वचा निस्तेज- शतावरी चूर्ण १ चमचा तुपावर भाजून; दूध साखरेसह लापशी करून सकाळी; तर सायं. उपळसरी चूर्ण घेणे.
वरचेवर राग येणे – शतावरी कल्प, कुष्मांडपाक किंवा च्यवनप्राश सकाळ-सायं. घेणे.
लघवी गरम, पिवळी होणे – आरोग्यवर्धिनी प्र. ३ गोळ्या दोन वेळा; रसायन चूर्णाबरोबर घेणे. युरिनरी इन्फेक्शन, मूत्राघात विकारात चंदनगंध, १ चमचा, चंदनादि वटी, गोक्षुरादि गुग्गुळ, रसायन व उपळसरी चूर्ण दोनदा घ्यावे. रात्रौ त्रिफळा चूर्ण घ्यावे.
तापात लघवी कमी होणे, आग होणे – नागरमोथा, चंदन, सुंठ, धने, वाळा प्र. ५ ग्रॅम एक लिटर पाण्यात अटवून अर्धा लि. उसवावे. गाळून थोडे थोडे प्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      अमेरिका
१९७१ च्या उन्हाळ्यात मी अमेरिकेला गेलो. काही महिन्यांपूर्वी घडलेले टर ढ’ं२३्रू या परीक्षेतले अपयश सलत होते. ती सल मनात ठेवूनच मी विमानात चढलो. अनेक वर्षे ही सल तशीच राहिली, मग गेली. शेवटी काळ सगळ्यावरच पांघरूण घालतो. पहिल्यांदा बोस्टनला माझ्या धाकटय़ा भावाकडे आठवडा काढला. हा चौसष्ट साली अमेरिकेला शिकायला गेला होता, तो तिथेच स्थायिक होता. हा माझा सख्खा भाऊ, परंतु अगदीच निराळा. कुटुंबवत्सल, मवाळ, व्यवस्थित कपडे घालणारा, मॅनर्स (टंल्लल्ली१२) बाळगणारा, सरळमार्गी आणि चार-पाच वर्षांतच अस्सल अमेरिकन राहणी आत्मसात करूनही आटोपशीर संसार करत आजूबाजूच्या मराठी माणसांमध्ये आपले लाघवी आणि प्रेमळ स्थान निर्माण करणारा असे त्याचे वर्णन करता येईल. त्याने मला अमेरिकेची जुजबी ओळख करून दिली. त्यातले एक वाक्य माझ्या ध्यानात राहिले आहे. तो म्हणाला होता, ‘‘या देशात हजारोहून अधिक रेडिओ स्टेशने चालतात. त्यातले कोणते स्टेशन निवडायचे हे तुमच्या मनावर ठरते.’’ ते वर्णन होते व्यक्तिस्वातंत्र्याचे. त्याचा प्रत्यय लगेच येऊ लागला. प्रत्येक माणूस स्वत:चेच वैशिष्टय़ बाळगून असे. कपडे, चष्मा, बूट, वाचन संस्कृती, विचार करण्याची दिशा अगदीच निराळी; परंतु कामावर किंवा सार्वजनिक ठिकाणी हे बहुविध स्वरूप असूनही एका विशिष्ट सामायिक तऱ्हेने चालण्याची यांची रीत मला मोठी वेधक वाटली. बोस्टनच्या उपनगरात माझा भाऊ राहत असे. त्या छोटेखानी गावातून मी शिकागो या भव्य आणि भारदस्त शहरात पोहोचलो तेव्हा खरे तर माझी छातीच दडपली. कुककौंटी रुग्णालयातल्या एका उंच वसतिगृहात मला जागा देण्यात आली होती. दीड खोल्यांचे ते एक छोटेसे घरच होते. तळमजल्यावर तिन्हीत्रिकाळ जेवणाचा सुकाळ होता. वसतिगृहात जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांतले डॉक्टर्स वास्तव्याला होते. समोरच कुककौंटी रुग्णालयाची टोलेजंग इमारत होती. हे अमेरिकेतले एक सुप्रसिद्ध धर्मदाय रुग्णालय. या रुग्णालयाचा आसमंत आणि टिळक रुग्णालयाचा शेजार यात एक विलक्षण साम्य होते. दोन्ही रुग्णालये गरीब वस्तीने वेढलेली. धारावीची वस्ती आणि इथल्या आजूबाजूच्या बहुसंख्य कृष्णवर्णीय गरिबांच्या वस्तीत मानसिक दृष्टीने काहीच फरक नव्हता. अर्थात इथला गरीब रुग्ण स्वत:च्या मोटारगाडीतून येत असे, पण त्या वेळेला तिथे जुनी गाडी २५० डॉलर्सला मिळत असे. डॉलरचा भाव होता पाच रुपये म्हणजे सवा हजारात गाडी पदरात पडे. आणखी एक फरक होता. इथले गुन्हे सुरामारीचे नव्हते, तर बंदुकीच्या साहाय्याने केले जात आणि इथले अनेक रुग्ण दारू किंवा मादक द्रव्याच्या आहारी गेलेले होते. १९७१ साली आणि नंतरच्या दोन वर्षांत अमेरिका एका अतिशय धकाधकीच्या काळातून जात होती. तो काळ मी अगदी जवळून बघितला.
रविन मायदेव थत्ते  १’३ँं३३ी@ॠें्र’.ूे