02 December 2020

News Flash

जे आले ते रमले.. : ख्रिस्तोफर बेनिजर यांचे प्रकल्प (२)

बेनिंजर यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत अनेक प्रकारचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

व्यवसायानिमित्ताने अहमदाबाद येथे १९७१ मध्ये आलेले वास्तुरचनातज्ज्ञ ख्रिस्तोफर बेनिजर यांनी भारत सरकार आणि वर्ल्ड बँक यांचे दोन वेगवेगळे मोठे गृहनिर्माण प्रकल्प उत्कृष्टरीत्या पूर्ण केल्यामुळे एक प्रतिभावान आर्किटेक्ट म्हणून नावारूपाला आले. पुढे १९७६ साली बेनिंजर यांनी आपल्या व्यवसायाचे प्रमुख केंद्र म्हणून पुणे शहराची निवड केली. पुण्यात ‘ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिजर आर्किटेक्ट्स’चे (सीसीबीए)कार्यालय थाटल्यापासून गेल्या ४० वर्षांत भारतात आणि परदेशांमध्ये त्यांच्या कामांचा व्याप आणि आवाका प्रचंड प्रमणात वाढला. सध्या त्यांच्याकडे ४० सहकारी आर्किटेक्ट्सची टीम असून ‘सीसीबीए’ची पुणे आणि भूतानची राजधानी थिफू येथे दोन प्रधान कार्यालये आहेत.

बेनिंजर यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत अनेक प्रकारचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक संस्था संकुले, नगररचना, मोठी हॉटेले, रुग्णालये, मोठय़ा गृहनिर्माण संस्था, कंपन्यांची केंद्रीय कार्यालये यांचा समावेश आहे. पुण्यात आल्यावर त्यांनी पूर्ण केलेला पहिला मोठा प्रकल्प १९७६-७९ या काळात हैद्राबादच्या युसुफगुडा येथील हुडको या संस्थेचा, २००० घरांचा होता. ख्रिस्तोफर यांच्या विशेष नावाजल्या गेलेल्या वास्तुरचनांत थिंफू येथील भूतान सरकार सचिवालय थिपू, थिपू स्ट्रक्चर प्लॅन, पुण्याचे यू.डब्ल्यू.सी.मिहद्र कॉलेज तसेच फोर्बस मार्शल इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स, सुझलॉन वन अर्थ ग्लोबल कॉर्पोरेट हेडक्वार्टर, इंडिया हाउस (सर्व पुणे), पुणे इंजिनीयिरग कॉलेजचा मास्टर प्लॅन, अ‍ॅम्बी व्हॅली इंटरनॅशनल स्कूल लोणावळा, कोचीन रिफायनरी आदींचा समावेश अमेरिकेतील बिझनेस वर्ल्ड या मासिकाने ख्रिस्तोफर यांची रचना असलेल्या महिंद्र युनायटेड वर्ल्ड कॉलेज संकुलाची गणना पहिल्या दहा ‘सुपर स्ट्रक्चर्स ऑफ द वर्ल्ड’ मध्ये केली आहे. जागतिक वास्तुरचनातज्ज्ञांच्या वर्तुळात बेनिजर यांची सीसीबीए ही कंपनी ‘डिझाइन हाऊस’ या नावाने ओळखली जाते. नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरच्या कार्यकारिणीचे कृतिशील सदस्य असलेले बेनिंजर ‘युनायटेड स्टेट्स एज्युकेशनल फाऊंडेशन’च्या (फुलब्राइट फाऊंडेशन) भारतातील कार्यकारी समितीचेही सदस्य आहेत.

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2018 12:59 am

Web Title: christopher beningers project
Next Stories
1 कुतूहल : युरेनिअम
2 कुतूहल : प्रोटॅक्टिनिअम
3 जे आले ते रमले.. : ख्रिस्तोफर बेनिंजर (१)
Just Now!
X