26 September 2020

News Flash

मार्क कब्बन – एक कुशल प्रशासक (२)

मार्क कब्बन या ब्रिटिश तरुणाची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीत एक सामान्य सनिक म्हणून झाली

मार्क कब्बन या ब्रिटिश तरुणाची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीत एक सामान्य सनिक म्हणून झाली आणि ते १८०१ मध्ये प्रथम कलकत्त्यास आले. प्रथम सेकंड मद्रास बटालियनमध्ये आणि पुढे विविध पदांवर विविध ठिकाणी काम करीत १८३४ मध्ये म्हैसूर राज्याचे कमिशनर म्हणून नियुक्त झाले. म्हैसूरचे कमिशनर म्हणून इ.स. १८३४ ते १८६० अशी २६ वर्षांची कब्बन यांची झालेली कारकीर्द उल्लेखनीय आहे. इ.स. १८३१ ते १८८१ ही पन्नास वष्रे ब्रिटिशांनी म्हैसूरचे प्रशासन स्वतकडे घेतले होते. कब्बन यांनी त्यांच्या कार्यकाळात म्हैसूरची ढासळत चाललेली आíथक परिस्थिती सुधारून म्हैसूर हे एक प्रगतिशील संस्थान बनवले.

प्रशासकीय बदल करताना मार्क कब्बन यांनी म्हैसूरऐवजी बंगलोर ही म्हैसूर राज्याची राजधानी केली आणि राज्याचे चार प्रशासकीय विभाग केले. या विभागांवर प्रत्येकी एक अधीक्षक नेमून राज्यात १२० तालुके स्थापन केले. राज्यात सर्वत्र समान कायदा संहिता तयार करून कब्बननी नवीन न्यायव्यवस्था आणली. राज्याच्या कनिष्ठ प्रशासनात कन्नड भाषेचा वापर सक्तीचा करून कब्बननी महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, न्याय, डाक, शिक्षण आणि घोडदळ अशी आठ प्रशासकीय खाती निर्माण केली. बंगलोर-जोलारपेट हा रेल्वेमार्ग सुरू करून त्यांनी १२०० किमी लांबीचे नवीन रस्ते निर्माण केले. कृषिक्षेत्रात कब्बन यांनी चहा, साखर आणि नीळ उत्पादनास चालना देतानाच दीड लाख एकरात कॉफीची लागवड केली. पुढे कॉफीची निर्यात सुरू करून म्हैसूर हे एक संपन्न राज्य बनवले. म्हैसूर राज्याच्या विकासाचा ध्यास घेऊन अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या या ब्रिटिश प्रशासकाची तब्येत पुढे बिघडली म्हणून त्यांनी १८६० साली आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. १८६१ साली मार्क कब्बन बोटीने मायदेशी परत जात असताना इजिप्तमध्ये सुवेझ येथे त्यांचे निधन झाले. बेंगळूरु ‘कब्बन पार्क’ असून बंगलोरवासीयांनी देणग्या गोळा करून कब्बन यांचा ब्राँझचा पुतळा उभा केला आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 12:03 am

Web Title: mark cuban
Next Stories
1 कुतूहल – सोन्यासारखं ‘सोनं’!
2 जे आले ते रमले.. : मार्क कब्बन (१)
3 कुतूहल : जीओलो ऊर्फ ऑरम!
Just Now!
X