News Flash

मनोवेध : सुप्त मन

आपल्या साऱ्या सवयी आणि व्यसनांचे मूळ जागृतीच्या पलीकडे असलेल्या ‘डोपामाइन रिवार्ड सिस्टीम’मध्ये आहे.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

आत्ता अमुक विचार माझ्या मनात आहेत, हे माणूस जाणू शकतो. त्या विचारांनुसार कृती करायची की नाही, हे आपण ठरवतो. जागे असताना आपल्याला जाणवणाऱ्या विचार, भावना, समज या साऱ्याला आपण ‘जागृत मन’ म्हणतो. पण या जागृत मनाच्या पलीकडे ‘सुप्त मन’ आहे, असा सिद्धांत प्रथम पिअरे जानेट (१८५९-१९४७) यांनी मांडला आणि सिग्मंड फ्रॉइड यांनी तो लोकप्रिय केला. जानेट यांनी त्यासाठी ‘सबकॉन्शस’ हा शब्द वापरला; जो फ्रॉइड यांनीही सुरुवातीला वापरला, पण नंतर ते ‘अनकॉन्शस’ हा शब्द वापरू लागले.

आजचे मेंदुविज्ञान हे मान्य करते की, आपल्या जागृत मनाला समजत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी मेंदूत आणि शरीरात सतत घडत असतात. त्यांचा प्रभाव आपल्या प्रकृतीवर आणि वागण्यावर होत असतो. आपल्या साऱ्या सवयी आणि व्यसनांचे मूळ जागृतीच्या पलीकडे असलेल्या ‘डोपामाइन रिवार्ड सिस्टीम’मध्ये आहे. या सवयी बदलायच्या असतील किंवा व्यसनांची गुलामी झिडकारायची असेल, तर ‘अटेन्शन ट्रेनिंग’ म्हणजेच ध्यान कसे उपयोगी पडू शकते, हेदेखील समजू लागले आहे आणि त्याचा खाण्याच्या चुकीच्या सवयी बदलण्यासाठी किंवा धूम्रपान सोडण्यासाठी यशस्वी वापर होऊ लागला आहे.

मात्र फ्रॉइडने सुप्त मन वर्णन करताना मांडलेल्या संकल्पना आणि त्यावर आधारित मनोविश्लेषण-मानसोपचार पद्धती आज फारशी वापरली जात नाही. याचे कारण या पद्धतीमध्ये सुप्त मनात काय चालले आहे, याचे विश्लेषण करण्यासाठी स्वप्ने वा बालपणातील स्मृती यांचा उपयोग केला जायचा. हा शोध घेणे सोपे नसते आणि त्यांचा परिणाम होतो हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध होऊ शकले नाही.

असे असले तरी फ्रॉइडने मांडलेल्या ‘इड’, ‘इगो’ आणि ‘सुपर इगो’ या संकल्पनेत थोडे बदल करून एरिक बर्न यांनी रूढ केलेली ‘ट्रान्झ्ॉक्शनल अ‍ॅनालिसिस’ ही मानसोपचार पद्धती सध्या वापरली जाते आणि ती आजदेखील आपल्या रोजच्या आयुष्यात उपयोगी ठरणारी आहे. ती पद्धती उद्या समजून घेऊ या..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 4:24 am

Web Title: subconscious dissociation theory of pierre janet zws 70
Next Stories
1 निरोगी अन् आनंदी जीवनाकडे..
2 पर्यावरण
3 मैत्री
Just Now!
X