डॉ. अकिरा मियावाकी या जपानी वनस्पतीशास्त्रज्ञास मियावाकी जंगलनिर्मिती तंत्रज्ञानाचे जन्मदाते म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २९ जानेवारी १९२८ रोजी झाला.

लहानपणापासूनच त्यांना वृक्षबीज संकलनाची आवड होती. शालेय जीवनात त्यांनी त्यांच्या मित्रमंडळीसह स्थानिक वृक्षांच्या बिया गोळा करून त्यापासून हजारो रोपांची निर्मिती केली. त्यांनी त्यांचे शिक्षण आणि संशोधन हिरोशिमा विद्यापीठात पूर्ण केले. स्थानिक परिसंस्था हा त्यांच्या अभ्यासक्रमाचा मुख्य विषय होता. १९६७ ते ७० या आपल्या संशोधन कालखंडात त्यांनी जपानमधील वृक्षराजीने समृद्ध असलेल्या जवळपास १० हजार भूभागांचा अभ्यास केला.

interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
elephant loksatta news
बेळगांव खानापूरमध्ये हत्ती पकड मोहीम, तर महाराष्ट्रात दोडामार्ग-चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक
Forest Minister Ganesh Naiks first visit to Vidarbha praise work of former Forest Minister
वनमंत्र्यांच्या पहिला विदर्भ दौरा, माजी वनमंत्र्यांच्या कामाचे कौतुक

या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, जपानमधील एकूण ६४ टक्के जंगले विदेशी वृक्षांनी समृद्ध आहेत आणि त्यात एक टक्क्यापेक्षाही कमी स्थानिक वृक्ष जीव मुठीत घेऊन कसे तरी जगत आहेत. त्यामध्ये निळा ओक, बांबू, चेस्टनटसारख्या अतिशय पुरातन वृक्षांचा समावेश असून ते मंदिर, बुद्ध विहार, प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी आणि देवराई भाग सोडून इतरत्र फारसे आढळत नाहीत. त्यांच्या असेही लक्षात आले की पाईनसारख्या परदेशी वृक्षांनी स्थानिक वृक्ष आणि त्यास जोडलेली जैवविविधता पूर्ण नष्ट केली आहे. हे लक्षात आल्यावर त्यांनी विज्ञान आणि

परिसंस्था अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्थानिक वृक्षांची लागवड करून जंगलनिर्मितीचा ध्यास घेतला. त्यातूनच मियावाकी जंगल

पद्धतीचा जपानमध्ये प्रसार झाला.

डॉ. मियावाकी म्हणतात, ‘मनुष्य जेव्हा निसर्गाचा मित्र होता तेव्हाच्या घनदाट जंगलाची मियावाकी जंगल ही एक प्रतिकृतीच आहे’. प्रा. मियावाकी यांनी जपानमध्ये कित्येक हजार किलोमीटर प्रवास करून तब्बल दहा  दशलक्ष स्थानिक वृक्षांच्या बिया गोळा केल्या.

त्यापासून रोपवाटिका तयार केल्या. त्यांनी जपानमध्ये एक हजार ३०० मियावाकी जंगले विकसित केली. अन्यही अनेक राष्ट्रांमध्ये या तंत्राचा प्रसार केला.

या वृक्षगुरूने ४० दशलक्ष स्थानिक वृक्ष फक्त लावलेच नाहीत, तर जोपासलेसुद्धा. १९९८ मध्ये या शास्त्रज्ञाने चार हजार स्वयंसेवकांच्या मदतीने ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’च्या दोन्हीही बाजूंना चार लाख स्थानिक मंगोलियन ओक वृक्षांचे रोपण केले. जपानमधील जंगलांचा सहा हजार पृष्ठांचा हरित नकाशा त्यांनी तयार केला. २००६ मध्ये त्यांना जर्मनीचा ‘ब्लू प्लॅनेट’ पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचे ‘द हिलिंग पॉवर ऑफ फॉरेस्ट’ हे पुस्तक अतिशय गाजले. या महान वृक्षप्रेमी शास्त्रज्ञाचे २६ जुलै २०२१ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader