कंथा भरतकामाचा प्रकार मुख्यत्वे बांगलादेश आणि भारतातील पश्चिम बंगाल व ओरिसा या प्रांतात लोकप्रिय आहे. ओरिसामधील स्त्रिया जुन्या साडय़ा एकमेकावर ठेवून हाताने जोडतात. त्यापासून एक पातळ आणि मऊ अशी पलंगावर घालायची आरामदायी चादर तयार होते. कंथा पद्धतीच्या भरतकामाचा वापर कंथा साडय़ांमध्येही केला जातो. ह्य़ा साडय़ा पश्चिम बंगालमध्ये नेहमी वापरल्या जातात. कंथा पद्धतीचे भरतकाम करून साध्या रजया तयार केल्या जातात. ज्या नक्षी कंथा म्हणून ओळखल्या जातात. बंगालमधील स्त्रिया जुन्या साडय़ा आणि कापड एकावर एक अंथरून त्याला कंथा पद्धतीने शिवतात. या मार्गाने हलके ब्लॅंकेट किंवा बेडशीट तयार होते. याचा वापर विशेषत्वाने लहान मुलांसाठी होतो. बंगालमध्ये, खासकरून, बोलपूर येथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी कंथा ही एक लोकप्रिय गोष्ट आहे.
कंथा हा भरतकामाचा प्रकार बंगालमधील ग्रामीण महिलांमध्ये खूप आवडता प्रकार आहे. पारंपरिकरीत्या कंथा भरतकाम करताना मऊ धोतरांचा आणि साडय़ांचा उपयोग केला जातो. त्यांना किनारीजवळ साधे धावते टाके घालून जोडले जाते. तयार झालेले हे वस्त्र लेप कंथा किंवा सूजनी कंथा अशा नावाने ओळखले जाते. स्त्रियांच्या अंगावर घ्यायच्या शालींपासून ते उशीचे अभ्रे, आरशाचे/ खोक्याचे कव्हर अशा वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये संपूर्ण कापड धावत्या टाक्याने विणून त्यामध्ये फुलांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आणि भौमित्तिक आकाराचे सुंदर नक्षीकाम केले जाते. भरतकामात दैनंदिन जीवनातील घडामोडींचे चित्रणही केले जाते. भरतकामाच्या या टाक्यांमुळे थोडा सुरकुत्या पडलेला परिणाम कापडावर दिसतो. पूर्वीपासून कंथा भरतकामाचा उपयोग साडय़ा, दुपट्टे, शर्ट, बेडशीट, घरगुती वापराचे पडदे वगरेकरिता केला जात आहे. भरतकामासाठी सुताबरोबर रेशमाचा वापरही बऱ्याच वेळा केला जायचा.
हा भरतकामाचा प्रकार साधा धावता टाका वापरून केला जातो आणि तो करायला सोपाही आहे. पूर्वी दुलई, साडी, धोतर याकरिता केला जाणारा या पद्धतीचा वापर आता शाली, उशाचे अभ्रे, दुपट्टे, पडद्याची कापडे, कुशन कव्हरवगरे करिताही केला जातो.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर -सांगली राज्यस्थापना
स्वतला रयतेचा मालक न समजता सेवक समजून संस्थानाच्या विश्वस्ताची भूमिका पार पाडणाऱ्या मोजक्या भारतीय राज्यकर्त्यांपकी सांगली संस्थानाचे पटवर्धन होते. पुण्याहून २३१ कि.मी. अंतरावर असलेले सांगली हे ब्रिटिशराजच्या काळातील नऊ तोफांच्या सलामींचा मान असलेले महत्त्वाचे संस्थान होते. बाराव्या शतकात चालुक्यांची राजधानी असलेले कुंडल पुढे सहा प्रमुख गल्ल्यांचे शहर म्हणून ‘सहागल्ली’ आणि त्याचे सांगली झाले. काही काळ मोगल साम्राज्यात असलेला हा प्रदेश शिवाजी महाराजांच्या काळात मराठय़ांच्या राज्याचा एक भाग बनला.
पटवर्धन घराण्यातले गोविंदराव, त्रिंबकराव आणि रामचंद्रपंत हे तिघे बंधू मराठा साम्राज्यातील उच्चपदस्थ सेनानी होते. या तिघांनी त्यांच्या युद्धकौशल्याने मराठा साम्राज्याची दक्षिण सीमा तुंगभद्रा नदीपर्यंत वाढविली. त्यांना त्यांच्या या कर्तृत्वामुळे कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांमधील प्रदेशाचे तीन भाग तिघांना जहागिरीत इनाम मिळाले. त्यापकी गोविंदराव यांना १७६१ मध्ये मिरज आणि काही गावांचा प्रदेश मिळाला. गोिवदरावांच्या चार मुलांपकी गोपाळराव व वामनराव यांच्या अकाली मृत्यूमुळे गोिवदरावांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या क्रमांकाचे पुत्र पांडुरंग हेच जहागिरीचे प्रमुख वारस झाले.
पांडुरंग यांच्या मृत्युमुळे त्यांचे सुपुत्र चिंतामणी सात वर्षांचे असताना, १७८२ साली मिरज जहागिरीच्या सरदारकीची वस्त्रे त्यांना मिळाली. चिंतामणी यांचे चुलते गंगाधरपंत यांच्याकडे जहागिरीचे पालक कारभारी म्हणून जबाबदारी आली. चिंतामणी तरुण वयातच मिरजच्या घोडदळाचे नेतृत्व करून सातारा छत्रपतींच्या मोहिमांवर जात असत. १८०० साली चिंतामणी टिपू सुलतानाच्या मोहिमेवरून मिरजला परतले असता चुलत्याने जहागिरीवरचे वारसा हक्काचे राजेपद चिंतामणरावांना नाकारले.
पाच-सहा गावांच्या गटाला त्या काळी कर्यात म्हणत. मिरज जहागिरीत असलेल्या २२ कर्यातींपकी सांगली हे एक होते. चुलत्याने राजेपद नाकारल्यावर चिंतामणी यांनी, घरातील गणपतीची मूर्ती घेऊन मिरज सोडले व कृष्णेकाठच्या सांगलीत जाऊन १८०१ साली सांगलीचे स्वतंत्र राज्य स्थापन केले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com