scorecardresearch

Premium

कुतूहल : सागरी दिन आणि मारपोलचे अर्धशतक

हा सोहळा जागतिक सागरी संघटनेच्या (इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन – आयएमओ) लंडन येथील मुख्यालयात ‘ऑनलाइन’ पद्धतीने पार पडेल आणि या प्रसंगी ही वास्तू निळय़ा प्रकाशात न्हाऊन निघेल.

kutuhal

कॅ. सुनील सुळे, मराठी विज्ञान परिषद

या वर्षीचा ‘जागतिक सागरी दिवस’ २८ सप्टेंबरला साजरा होत आहे आणि विषय आहे ‘मारपोलचे अर्धशतक- आम्ही कटिबद्ध आहोत,’ मारपोल (द इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द प्रिव्हेंशन ऑफ पोल्युशन फ्रॉम शिप्स) ही नियमावली सागरी पर्यावरणाच्या रक्षणार्थ तयार करण्यात आली आहे आणि यंदा या घटनेची अर्धशतकपूर्ती साजरी करण्यात येत आहे.

aero modeling show pune, aero modeling show organized in pune
पुणे : रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके
9th edition, World of Concrete India (WIKI), october, mumbai, concrete industry,
बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण
better dental cleaning reduce cancer risk
आरोग्य वार्ता : दातांच्या स्वच्छतेमुळे कर्करोगाचा धोका कमी
Etihad Airways
एतिहाद एअरवेजकडून ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती, कंपनीचा भारतीय बाजारपेठेत पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

हा सोहळा जागतिक सागरी संघटनेच्या (इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन – आयएमओ) लंडन येथील मुख्यालयात ‘ऑनलाइन’ पद्धतीने पार पडेल आणि या प्रसंगी ही वास्तू निळय़ा प्रकाशात न्हाऊन निघेल. त्याचबरोबर जगभरातील जहाजे, बंदरे, पूल आणि नौवहनाशी संबंधित संस्थांच्या इमारतीसुद्धा प्रकाशित केल्या जातील. पर्यावरणविषयक कार्यक्षमता, जहाजांवर निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन, सागरी इंधनांमध्ये नवे पर्याय शोधणे, सागरी वाहतुकीतून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करणे, ‘हरित वित्त’ (ग्रीन फायनान्स) बंधमुक्त करणे आणि या सर्वाकरिता आवश्यक असलेले सहकार्य जोपासणे या विषयांवर चर्चा होईल. या सोहळय़ात आयएमओने सर्व देशांना वर्ल्ड मेरिटाइम डे हा हॅशटॅग वापरून ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन या समाजमाध्यमांवर हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

या दिनाची पार्श्वभूमी म्हणजे जागतिक नौवहनाद्वारे जगातील ८० टक्के व्यापार चालतो. जगातील बहुतेक सर्व मालाच्या वाहतुकीसाठी सागरी मार्ग हा सर्वात किफायतशीर आणि कार्यक्षम समजला जातो. सागरी मार्गाने आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळून जगभरातील देशांची आणि समाजांची प्रगती होते. गेली अनेक शतके नौवहनाच्या माध्यमातून जागतिक व्यापाराचा विकास झाला आहे आणि भविष्यातही तो तसाच होत राहील अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. यामुळे नौवहन हा शाश्वत विकासाला पूरक उद्योग म्हणून त्याला प्रोत्साहन देण्याचे काम अविरत सुरू आहे आणि हेच उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवून ऊर्जा कार्यक्षमता, नवनवे तंत्रज्ञान, सागरविषयक शिक्षण आणि प्रशिक्षण, तसेच सर्व प्रकारची सुरक्षा, दळणवळणाचे नियोजन आणि या सर्वासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी जागतिक पातळीवर मानके तयार करण्यासाठी आयएमओ वचनबद्ध आहे. या सर्व उपक्रमांशिवाय या जागतिक सागरी दिनानिमित्त भविष्यात पृथ्वीवरच्या महासागरांचा आणि इतर नैसर्गिक संपत्तीचा शाश्वत स्रोत म्हणून वापर करण्याची जाणीव जनमानसात रुजवणे हेही ध्येय आयएमओच्या नजरेसमोर आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal world oceans day and the international convention for the prevention of pollution from ships half century ysh

First published on: 28-09-2023 at 03:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×