आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यावर उपलब्ध असलेली इंटरनेटची किंमतही सर्वसामान्यांना परवडत आहे. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, यूटय़ूबसारख्या समाजमाध्यमांवर रोज मोठय़ा प्रमाणात लिखित मजकूर, चित्र, चलचित्र अशा रूपात डेटा टाकला जात आहे. २०१५ नंतर तर हे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे.

परंतु या डेटाला ‘कच्चा डेटा’ असे म्हटले जाते. यंत्राला शिक्षण देण्यासाठी यावर काम करून त्याचे उपयुक्त विदेत रूपांतर करणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षांत मायक्रोसॉफ्ट, गूगल, फेसबुक, यूटय़ूबसारख्या कंपन्यांनी या कच्च्या डेटावर काम करून त्याचे उपयुक्त विदेत रूपांतरच केले नाही, तर ती विदा ‘पब्लिक डेटासेट’च्या माध्यमातून सखोल शिक्षणाच्या अभ्यासकांसाठी मोफत उपलब्धही करून दिली. यामुळे सखोल शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांची मोठी गरज भागली. तीन लाखांहून अधिक प्रतिमा असलेला ‘मायक्रोसॉफ्ट कोको’, चलचित्रांसाठी ६१ लाख यूटय़ूब व्हिडीओज असलेला ‘यूटय़ूब एट मिलियन’, लिखित मजकुरासाठी ‘विकिपीडिया’तून घेतलेली दीड लाख प्रश्नोत्तरे असलेला ‘स्क्वाड’ आणि ध्वनिफितींसाठी २० लाख ध्वनिफिती असलेला ‘गूगल ऑडिओसेट’ ही या ‘पब्लिक डेटासेट’ची काही उदाहरणे. 

private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
siddharth jawahar scam marathi news
वित्तरंजन – सिद्धार्थ जवाहर: नव -पॉन्झी

यंत्राला सखोल शिक्षण देताना खूप मोठय़ा प्रमाणात संगणकीय गणनक्षमतेची गरज असते. एका मध्यम आकाराच्या कृत्रिम चेतापेशींच्या जाळय़ाच्या शिक्षणासाठी सर्वसाधारण संगणकाच्या सीपीयू (सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट)ला काही दिवस अथवा आठवडेसुद्धा लागू शकतात. यासाठी समांतर प्रक्रिया असणारी जीपीयू (ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट) वापरली जातात, ज्यायोगे हा वेळ बराच कमी होतो. जीपीयूच्या तुलनेत सीपीयूला शिक्षणासाठी २० ते ३०पट वेळ लागतो. खास सखोल शिक्षणाच्या गरजेचा विचार करून काही इलेक्ट्रॉनिक चिप्स तयार केल्या गेल्या आहेत. गूगलने तयार केलेली टीपीयू (टेन्सर प्रोसेसिंग युनिट) चिप हे याचे उत्तम उदाहरण. अशा अत्यंत उत्तम गणनक्षमतेचे संगणक हे गेल्या दहा वर्षांतच उपलब्ध झाले आहेत.

सखोल शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी गूगलने ‘टेन्सरफ्लो’ नावाने आणि फेसबुकने ‘पायटोर्च’ या नावाने आपापली फ्रेमवर्क्‍स उपलब्ध करून दिली. या फ्रेमवर्क्‍सच्या माध्यमातून सखोल शिक्षणाच्या आज्ञावल्या लिहिणे सुकर झाले. सगळय़ा गोष्टी मुळापासून लिहायची गरज उरली नाही. आधीच लिहिली गेलेली लायब्ररी फंक्शन्स वापरून मूळ प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याची सोय झाली. या सर्व कारणांमुळे सखोल शिक्षणाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झालेली दिसून येते.

 मकरंद भोंसले, मराठी विज्ञान परिषद