नारायणपेठ साडय़ा

नारायणपेठ साडी म्हटली की त्याचा संबंध पुण्याशी असला पाहिजे अशी कोणाचीही सहज समजूत होऊ शकेल.

नारायणपेठ साडी म्हटली की त्याचा संबंध पुण्याशी असला पाहिजे अशी कोणाचीही सहज समजूत होऊ शकेल. या साडीचा पुण्याशी थेट संबंध नसला तरी महाराष्ट्राशी आहे, आणि साडीची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली आहे. परंतु याचे विणकाम आंध्र प्रदेशातील नारायणपेठ या गावातील विणकर करतात, त्यामुळे ती साडी नारायणपेठ म्हणून ओळखली जाते.

इतिहासातील दाखल्यानुसार १६३० साली शिवाजी महाराज आपल्या सरदारांसोबत नारायणपेठ येथे गेले होते. आणि काही काळ मुक्काम करून महाराजांचा ताफा तिथून पुढे निघून गेला. पण त्यातील काही विणकर नारायणपेठ येथेच राहिले. याच विणकरांनी पुढे विशेष अशा रेशमी साडय़ा निर्माण करायला सुरुवात केली. त्यांना ‘नारायणपेठ’ साडी अशी ओळख मिळाली. त्याचमुळे या साडीच्या विणकरीमध्ये महाराष्ट्राचा ठसा उमटलेला दिसतो. कालांतराने स्थानिक राजांनीही या साडीला उत्तेजन दिले. परिणामी रेशमी आणि सुती अशा दोन्ही प्रकारच्या साडय़ांची निर्मिती सुरूच राहिली.
नारायणपेठ साडीमध्ये नसíगक रंगाचा वापर केला जातो. तसेच एका वेळी आठ साडय़ा विणण्याएवढा ताणा हातमागावर एकदम चढवला जातो. अन्यथा नेहमी एक किंवा दोन साडय़ांचा ताणा मागावर घेऊन विणकाम केले जाते. रंगाई वगरे पूर्वतयारी करून नंतर हातमागावर साडी विणली जाते. सुती साडी विणायला एक दिवस पुरतो, तर रेशमी साडी विणायला चार-पाच दिवस लागतात. सन २०१२ मध्ये नारायणपेठ साडीला ‘स्थानमाहात्म्य दर्शक’ प्रमाणपत्र मिळाले. नारायणपेठ साडी किमतीला स्वस्त असल्यामुळे सर्व उत्पन्न गटातील स्त्रियांना ती खरेदी करता येते. रेशमी साडीची किंमत जास्तीत जास्त ६००० रुपयांपर्यंत असते, तर कमीत कमी १००० रुपये एवढी असते. आंध्रातील नारायणपेठच्या काही विणकरांनी सोलापूर येथे स्थलांतर केले, असा कयास आहे. या विणकरांनी सोलापूर येथे नारायणपेठ साडय़ांची निर्मिती सुरू केली. सोलापूरला तयार होणाऱ्या नारायणपेठ साडय़ांवर चित्रांच्या स्वरूपात अजिंठा-वेरुळ लेण्यांचे देखावे असतात. रेशमी साडीला जरीचा काठ असतो. पदरावरील रुद्राक्ष ही येथील नारायणपेठ साडीची खासियत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष पदरावर विणलेले असतात. म्हणूनच या साडीला रुद्राक्ष साडी म्हणूनही ओळखले जाते.

– दिलीप हेर्लेकर (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्रिपुरा संस्थान

त्रिपुरा संस्थानाचा राजा राधाकिशोर माणिक्य हा कला, साहीत्य आणि शिक्षण यांचा आश्रयदाता होता. त्याने राज्यातील कोमिल्ला (सध्या बांगला देश) येथे व्हिक्टोरिया कॉलेज आणि कैलाशहर येथे शाळा सुरू केली. त्याचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याशी जवळचे संबंध होते. रवींद्रनाथांचे अगरताळा येथे जाणे-येणे होते. राजाने रवींद्रनाथांच्या विश्वभारती विद्यापीठासाठी वार्षकि एक हजार रुपयांचे अनुदान दिले. भूकंपांमुळे राज्याची आíथक परिस्थिती डबघाईला आली असतानाही राजाने हे अनुदान चालू ठेवले. रवींद्रनाथांनी त्रिपुराला ६० वर्षांत सात वेळा भेट दिली. बीरचंद्र, राधाकिशोर, बिरेंद्र किशोर आणि बीर बिक्रम या राजांशी त्यांचे नाते मित्रत्वाचे, मार्गदर्शकाचे, सल्लागाराचे होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि राधाकिशोर यांच्यातील मैत्रीमुळे बंगालमधील साहित्य आणि सांस्कृतिक जडणघडणीवरही त्रिपुराचा प्रभाव दिसून येतो.
त्याकाळच्या कलकत्त्याचे विख्यात शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस हे लंडनमध्ये जीवशास्त्र संशोधन करीत असताना आíथक अडचणींमुळे त्रस्त झाले. अशा वेळी रिवद्रनाथांनी काही मदत मागितली. त्या काळात त्रिपुरात नुकताच भूकंप झाला होता आणि राज्याची आíथक ओढाताण चालू होती. राजा राधाकिशोर याने स्वतचे कौटुंबिक जडजवाहर गहाण ठेवून जगदीश चंद्रांना ५० हजार रुपयांची मदत पाठविली. तीही, यामध्ये राजाचे नाव कुठेही जाहीर न करण्याच्या अटीवर!
किरीत बिक्रम किशोर हा त्रिपुराचा शेवटचा राजा. त्याची कारकीर्द सन १९४७ ते १९४९ अशी केवळ दोन वर्षांची झाली. तो राजेपदावर आला त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्याची आई राणी कांचन प्रावा देवी हिने पालक कारभारी म्हणून काम केले. तिनेच १५ ऑक्टोबर १९४९ रोजी त्रिपुरा संस्थान स्वतंत्र भारतात विलीनीकरणाच्या दस्तऐवजांवर सही केली.
भारत सरकारने १९६३ साली त्रिपुरा केंद्रशासित प्रदेश घोषीत केला आणि १९७२ त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.

 सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Varieties of indian sarees