पालघर तालुक्यातील सालवड, दांडी आणि पास्थळ परीसरात बिबट्याच्या संचाराचे छायाचित्र आणि व्हिडीओ समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारीत केले जात असले तरी या अफवा असल्याची माहिती पुढे आली आहे. बिबट्याचे चुकीच्या पद्धतीने व सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार केलेले फोटो आणि व्हिडीओ प्रसारीत केले जात असून या अफवांवर विश्वास ठेवू नये असे परिपत्रक जारी करण्याची वेळ सालवड ग्रामपंचायतीवर आली आहे.

प्रसारित होणारी बिबट्याची चुकीची छायाचित्रे आणि व्हिडीओमुळे वनविभागाची डोकेदुखी मात्र भलतीच वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. गेल्या आठ- दहा दिवसांपासून तारापूर, चिंचणी व टँप्स परीसरात बिबट्या दिसल्याच्या अफवा वेगाने प्रसारीत होत आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी व वन्यजीव बचाव पथकाचे स्वयंसेवक घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या अस्तित्वाच्या खुणा अथवा पुरावे शोधण्याचे प्रयत्न करतात. मात्र माती कडक व सुकलेली असल्याने त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

Salwad Leopard

हेही वाचा – पालघर : बिबट्याचा वावर अभ्यासण्यासाठी १० ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर, नागरिकांमध्ये जनजागृती

आज सकाळी सालवड ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरातील रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याचा फोटो समाजमाध्यमांवर असाच व्हायरल झाला. वन विभागानं तिथं धाव घेतली, मात्र हीदेखील अफवाच असल्याचं आढळून आले आहे. त्यामुळे बिबट्याचा समाजमाध्यमामध्ये फिरत असलेला फोटो खोटा असल्याचे पत्रक काढून सांगण्याची वेळ सालवड ग्रामपंचायतीवर आली.

हेही वाचा – पालघर : वाढवण बंदर विरोधी कृती समितीच्या बैठकीला पालघरच्या लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याच्या हल्ल्याची घटना

पालघर तालुक्यातील कुडण गावातील दस्तुरी पाड्यातील प्रेम पाटील या सात वर्षीय बालकावर पाच दिवसांपूर्वी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घराबाहेर खेळत असताना बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला होता. चेहरा आणि डोक्याच्या भागाचे लचके तोडल्याने गंभीर जखमी अवस्थेत प्रेमला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुत्र्यांच्या भुकण्यांमुळे बिबट्याने पळ काढला आणि प्रेमचा जीव वाचला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर मात्र बिबट्याचा वावर कुठेच आढळून आलेला नाही, असे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यानंतर अनेक अफवांना पेव फुटलेले आहे. सोमवारी दांडी येथे बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याचे तसेच अक्करपट्टी आणि आता सालवड परीसरात बिबट्या दिसला असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.