पालघर : जिल्ह्यातील चिंचणी- बावडा ते तारापूर- कोळगाव (पालघर) परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक घटनांवरून अधोरेखित होत असून बिबट्याचा वावर संदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी आलटून पालटून पाच ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बिबट्याने एका लहान मुला व्यतिरिक्त इतर कोणावरही हल्ला केल्याची घटना घडली नसल्याने संबंधित भागात जनजागृती करण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू आहेत.

दांडी येथील अणुविकास विद्यालयाच्या परिसरात आज सकाळी बिबट्या सदृश्य जनावराचे ठसे उमटल्याचे दिसल्यानंतर यासंदर्भात माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. या ठाशांच्या पडताळणी करण्यासाठी वनविभागाची तज्ञ समिती दांडी येथे दाखल होत आहे. दरम्यान अक्करपट्टी गावात बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला कळवण्यात आली होती. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अधिकारी वर्ग गेला असता बिबट्या दिसलेल्या ठिकाणाचा तपशील प्राप्त न झाल्याने वनविभागाचे अधिकारी परतल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

हेही वाचा : बोईसर : तारापूरच्या प्रदूषणाविरोधात खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पालघर तालुक्यातील कुडण येथे गेल्या आठवड्यात बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी मोठ्या प्रमाणात धुके असल्याने तसेच हल्ल्यात जखमी झालेला मुलगा प्राण्याचे योग्य वर्णन करू शकला नसल्याने बिबट्याचा वावर निश्चित झाला नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात हल्ला झालेल्या मुलाच्या पालकांनी वन विभागाकडे अजूनही तक्रार दिली नसून त्या संदर्भात वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त होणे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली.

बिबट्याचा वावर चिंचणी, बावडा, तारापूर ते कोळगाव भागात होत असल्याचे अनेकदा दिसून आले असले तरीही या संदर्भात बीएआरसी केंद्रातील अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. शिवाय बिबट्याने जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना पुढे आल्या नसून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा : डहाणू: विवळवेढे गडावर थरारक घटना, दरीत गिर्यारोहक पडूनही वाचला जीव..

दरम्यान बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने १० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून टॅप्स, बीएआरसी व कुडण परिसरात ते बसवण्यात आले आहेत. प्रत्येकी पाच कॅमेऱ्याची माहिती आलटून पालटून तपासण्यात येत असून त्यामध्ये अजूनही बिबट्याचा वावर झाल्याचे अधोरेखित झाले नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

“बिबट्याच्या वावरासंदर्भात माहिती संकलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिबट्याचा एखाद्या ठिकाणी पुनरागमन किंवा व्यक्ती अथवा जणांवर हल्ला केल्याची माहिती नाही. नागरिकांमध्ये सतर्कता ठेवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून वनविभाग याविषयी सतर्कता बाळगून आहे.” – मधुमिता दिवाकर, उप वन संरक्षक, डहाणू

हेही वाचा : पालघर: अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चिंचणी येथून दोघे पोलिसांच्या ताब्यात

जनजागृती व सल्ला

मोकाट प्राणी, कुत्र्यांना कचरा आकर्षित करत असल्याने ग्राम परिसर घरकामातील कचऱ्यापासून स्वच्छ ठेवण्यात यावा.
मानवी वस्तीमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यात यावी.
कधीही बिबट्या दिसल्यास जोराने आरडाओरड करावी व हाताने टाळ्या वाजवाव्यात.
लहान मुलांना एकटे सोडू नये.
एकांत असणाऱ्या ठिकाणी एकटे प्रवास करू नये, सोबत बॅटरी, मोबाईलचा टॉर्च, अन्य प्रकाश व्यवस्था सुरू ठेवण्याची व्यवस्था करावी. एकांतात जाण्याची वेळ आल्यास गाणी अथवा इतर ध्वनी व्यवस्था सुरू ठेवावी.
मानवी वसाहती जवळ बिबट्या निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या वन कार्यालयाशी संपर्क करावा.