father and son killed as truck hits their two wheeler at palghar manor road zws 70 | Loksatta

नशेत धुंद ट्रक चालकाने तीन वाहनांना दिली धडक ; अपघातात चार वर्षाच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू तर तीन जखमी

ट्रक ड्रायव्हर मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ट्रक चालवत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

नशेत धुंद ट्रक चालकाने तीन वाहनांना दिली धडक ; अपघातात चार वर्षाच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू तर तीन जखमी
चुकीच्या दिशेने ट्रक भरधाव नेत पिता पुत्रीच्या मोटारसायकलवर जोरदार धडक दिली

पालघर: पालघर मनोर रस्ता पूर्वेकडील देवीकृपा हॉटेल परिसरामध्ये भरधाव ट्रकने तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात गणेश नगर येथील पिता व चार वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर इतर तीन जण जखमी आहेत.

ट्रक ड्रायव्हर मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ट्रक चालवत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दारू पिऊन भरधाव ट्रक चालवणार्या चालकाने चुकीच्या दिशेने ट्रक भरधाव नेत पिता पुत्रीच्या मोटारसायकलवर जोरदार धडक दिली व त्यात पित्यासह मुलीचा जागीच मृत्यू झाला.

पिता पुत्रीला ठोकर दिल्यानंतर या ट्रकने पुढे उभ्या असलेल्या एका चार चाकी वाहनासह दुचाकी वाहनालाही धडक दिल्याचे सांगितले जाते. या घटनेत इतर तीघाना जखमा झाल्याचे समजते.त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी पालघर पोलीस दाखल झाले असून मृत पिता व त्याच्या मुलीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. मद्यधुंद ट्रक चालकाला चोप देऊन त्याला पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 23:56 IST
Next Story
वाडा, वसई तालुक्यांत भातपिकांचे नुकसान ; इतर तालुक्यांतही नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा