पालघर: सिल्वर पापलेटला ‘राज्य मासा’ चा दर्जा देण्याबाबरवंगी घोषणा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील मत्स्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत घोषणा केली. यामुळे झपाटयाने उत्पादन घडणाऱ्या पापलेट माशाचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना व प्रबोधन नियमन आखणे होणार शक्य होणार आहे.

देशातील अनेक राज्यातील निवडक प्रजातींची शाश्वतता, संवर्धन व वाढीसाठी प्रजातीला राज्य मासे म्हणून केंद्र सरकारने घोषित केले आहे. या धर्तीवर मत्स्यप्रेमीं च्या आवडत्या पापलेट (सिल्वर पॉमफ्रेट) या मत्स्य प्रजातीचे जतन करण्यासोबतच सागरी परिसंस्थेचे रक्षण, लहान माशांच्या मासेमारीला आळा घालण्यासाठी आणि शाश्वत मासेमारी पद्धतीने प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सिल्वर पापलेटला महाराष्ट्राचा ‘राज्य मासा’ म्हणून घोषित करण्याची मागणी सातपाटी येथील मच्छीमार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्याचे मत्स्य, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती.

हेही वाचा >>>वाढवण बंदर प्रकरणी मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

महाराष्ट्राच्या सागरी जलाधिक क्षेत्रातील पापलेट या मासेमारीचे महत्त्व आणि त्यांला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्याने या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी सागरी पर्यावरणात समतोल राखता येईल तसेच मच्छीमार किनारपट्टीवरील समुदाय, स्वयंसेवी संस्था व सरकारी एजन्सी या सारख्या विविध भागधारकांना सहभागी करून सिल्वर पापलेट आणि त्याच्या पर्यावरणाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ तयार करणे यापुढे शक्य होणार आहे. या माध्यमातून सिल्वर पापलेटच्या राज्य मत्स्य स्थितीवर भर दिल्यास शाश्वत मासेमारी पद्धतीने चालना मिळू शकते. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि या प्रतिष्ठित प्रजातीचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित होईल तसेच महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाने सिल्वर पापलेटचे महत्त्व जाणून त्यास टपाल तिकीट ही जारी केले होते.

पापलेट या माशाला स्थानिक पातळीवर सरंगा म्हणून ओळखले जाते. पापलेट हे व्यावसायिक दृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त निर्यात केले जाणारे आणि पसंतीचे सागरी अन्न आहे. महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पापलेटला विशेष स्थान आहे. ही प्रजाती किनारपट्टीवरील समुदायाच्या उपजीविकेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत सिल्वर पापलेट त्याच्या स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्य साठी प्रसिद्ध आहे.

हेही वाचा >>>बचत गटाला स्वावलंबी बनवण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा अभिनव प्रयोग

१९८० पासून पापलेटच्या उत्पादनात सातत्याने घट

काही दशकांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पापलेट व्यापारातील बदलासह मासेमारी पद्धतीतील बदलामुळे लहान माशांच्या पापलेट माशांची बेछूट मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भारताच्या वायव्य भागातील पापलेट माशांच्या साठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. पापलेटचे सरासरी वार्षिक उत्पादन १९६२ ते १९७६ दरम्यान ८३१२ टन, १९९१ ते २००० दरम्यान ६५९२ टन, २००१ ते २०१० दरम्यान ४४४५ टन तर २०१० ते २०१८ मध्ये ४१५४ टन पापलेट उत्पादन नोंदविण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत सिल्वर पॉमफ्रेटला विशेष स्थान आहे. पापलेट ही मस्त्य प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी प्रबोधन नियमन होणे या दृष्टिकोनातू सिल्वर पॉमफ्रेटला (पापलेट/सरंगा) महाराष्ट्राचा “राज्य मासा” म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्थांचे संयुक्त निवेदन मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन सादर केले होते. मंत्री महोदयांनी तत्काळ कार्यवाही केल्याने आम्ही समाधानी आहेत.- राजेंद्र मेहेर, चेअरमन, सातपाटी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था