पालघर: डहाणू तालुक्यात सायवन किन्हवली रस्त्यावर अवैध मद्य तस्करी करण्याचा प्रकार उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाकडून उधळला गेला आहे. कारवाईत परराज्यातील बेकायदा मद्यसाठा जप्त केला गेला. यावेळी चार लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
दमण येथून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या मद्याची तस्करी होत असल्याची खबर भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी किन्हवली सायवन रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर, दुय्यम निरीक्षक पांडुरंग तुकाराम पडवळ, जवान संदीप पवार, भाऊसाहेब कराड, प्रशांत निकुंभ, अनिल पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. रात्री नऊच्या सुमारास संशयित वाहनाची तपासणी करताना त्यात सुमारे २५.९२ लिटरचा विदेशी मद्यसाठा आढळून आला.
यावेळी पोलिसांनी वाहनचालक सुरेश रामस्वरूप मंडल आणि सागर पांडुरंग भोईर यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal liquor smuggling foreign countries stopped four lakh item seized excise squad amy
First published on: 15-04-2022 at 01:33 IST