कासा : आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये धानिवरी गावाजवळ असताना शॉर्टसर्किट होऊन ट्रकला भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच ट्रकचालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा : पालघरमध्ये अपघातांची मालिका, दोन दिवसांत तीन अपघात; चार जणांचा मृत्यू तर सात जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रकला लागलेली आगीने भीषण रूप घेतले. आग आणि धुराचे लोट महामार्गावर येत असल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रकची आग कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक आणि ट्रकमधील माल पूर्णपणे जळून खाक झाला.