शेतकरी दुबार पेरणीपासून वंचित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू : सूर्या कालवे पाटबंधारेअंतर्गत गेली सुमारे ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही धरणाचे काम पूर्णत्वास जात असतानाच उजव्या व डाव्या कालव्यांची कामे मात्र अपूर्णावस्थेत आहेत. चारोटी, घोळ दाभोन, ऐना तसेच अनेक भागांत गावाजवळ पाट येऊनही पाटाला पाणी येत नसल्याने बहुतांश शेतकरी उन्हाळी भातशेतीला मुकले आहेत. त्यामुळे कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. डहाणूत सूर्या कालव्यांची दुरवस्था झाल्याने पाटाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही. भराड  नवापाडा येथे सूर्या कालव्याचा जलसेतू मोडून पडला असल्याने पलीकडे पाणी वाहून नेले जात नाही. परिणामी, सिंचन प्रकल्पच फसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिके घेण्याच्या  संधीला मुकावे लागत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incomplete works surya dam canal ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST