दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत बिर्याणी विक्रेत्याने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.२९) बोईसरच्या हद्दीत उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बिर्याणी विक्री करणाऱ्या दुकानदारा विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोईसर परिसरात राहणारी दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी, तिची चार वर्षाची बहीण आणि शेजारची एक मुलगी गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोईसर शहरातील येथील बिर्याणीच्या दुकानात बिर्याणी आणण्यासाठी गेल्या होत्या. साडे सात वाजण्याच्या सुमारास तिघी जणी बिर्याणी घेवून घरी परतल्या. परंतु घरी परतलेली दहा वर्षीय मुलगी घाबरून रडायला लागली होती.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : दिल्लीला इतक्या वाऱ्या का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कारण…”, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

तिच्या आईने तिला विश्वासात घेत विचारले असता तिने दिलेली माहिती धक्कादायक होती. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार बिर्याणीच्या दुकानात पोहोचल्यानंतर बिर्याणी विक्रेत्याने तिची लहान बहीण आणि शेजारच्या मुलीला बिर्याणीच्या दुकानासमोरच्या दुकानात पाठवले होते. दोघी जणी गेल्यानंतर दुकान मालकाने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून दुकानाच्या आत घेऊन गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केल्यानंतर दुकानदाराने तिचा हात सोडून दिला. त्यावेळी समोरच्या दुकानात गेलेल्या दोघी जणी परतल्या, त्यानंतर बिर्याणी विक्रेत्याने तिघींना बिर्याणीचे पॅकेट दिले आणि त्या घरी परतल्या.

हेही वाचा… Video : “वार होते कडवट, जिव्हारी आणि…”, वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचं खास ट्वीट; वर्षभराचा आढावा काव्यरुपात सादर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भेदरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्या नंतर आईने तिच्या वडिलांना घरी बोलावून घेतले. घडलेल्या घटनेबाबत कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत चर्चा केल्यानंतर पीडित मुलीच्या आईने बिर्याणी विक्रेत्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी बिर्याणी विक्रेत्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ आणि पोस्को कायद्याच्या कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.