लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्ताने युवाशक्ती प्रतिष्ठान मार्फत आशेरी गडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये ३५० हून अधिक दिव्यांची सजावट ही राजसदरेवर करण्यात आली. तद्यनंतर आशेरी गडाची गड देवता आशेरी मातेच्या गुंफेमध्ये सुद्धा ३५० हुन अधिक दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.

युवाशक्ती प्रतिष्ठा च्या माध्यमातून दरवर्षी प्रथम दिवा हा गडावर नंतर आपल्या घरी ही संकल्पना रबवली जाते. त्याचे अनुकरण करत आशेरी गडावर मध्यरात्री दीपोत्सव साजरा केला. यामध्ये युवाशक्ती प्रतिष्ठान चे प्रशांत सातवी, प्रितम पाटील, जयेश पाटील, हार्दिक पाटील, प्रसाद शिंदे, रितेश पवार, ऋत्विक पवार व ऋतिक पाटील या दुर्गमित्रांनी सहभाग नोंदवीला.

आणखी वाचा-शहरबात : ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळालेला बोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली अनेक वर्ष आशेरी गडावर युवाशक्ती प्रतिष्ठान पालघरच्या माध्यमातून दुर्ग संवर्धनाचे कार्य सुरु आहे. यामध्ये आशेरी गडावरील राजसदर, आशेरी मातेचे गुफा यांना नवसंजीवनी देण्याचे काम तसेच सूचना, माहिती व दिशा दर्शक फलक हे काम युवाशक्ती प्रतिष्ठान च्या माध्यमातून करण्यात आले आहे. येत्या काळात लवकरच पुन्हा काही नवीन संकल्पनेतून संवर्धन करण्यात येईल असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.