डहाणू : महाराष्ट्र राज्यातील तिसरे मधाचे गाव म्हणून डहाणू तालुक्यातील घोलवड गावाला नामांकन मिळाले आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने गावाला मानांकन दिले असून यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी वितरित करण्यात येणार आहे. घोलवड येथे बुधवार ६ डिसेंबर रोजी आयोजित मध उत्पादन जनजागृती मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे.

शेती जोड व्यवसाय, अल्पभूधारक आणि भूमिहीन नागरिकांसाठी मधमाशी पालनाचे माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून ग्रामपंचायत मार्फत मधमाशी पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरात पाच मधपेट्या ठेवण्याचं ग्रामपंचायतचा मानस असल्याचे सरपंचांनी सांगितले. तर यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय या मोहिमेत महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा यासाठी ग्रामपंचायत निधीतून १५ टक्के निधीतून मधपेट्या ग्रामस्थांसाठी खरेदी करण्यात येणार असून एका सामाजिक संस्थेकडून देखील मधपेट्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : सातपाटी प्रवासी जेट्टीला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; वाढीव दर निश्चिती करून कामाला आरंभ होणार

घोलवड येथे बुधवारी आयोजित जनजागृती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी मध संकलन ये ब्रँड विक्रीचे उद्दिष्ट सांगितले. पंतप्रधान यांच्या मन की बात या कार्यक्रमात घोलवड गावाचा उल्लेख व्हावा इतके झपाटलेले कार्य करण्याची ऊर्जा निर्माण करा असे आवाहन मेघाश्रय फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा सिंग यांनी केले. खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी मधाचे गाव मधुवन या विशेष उपक्रमातून मध उत्पादन, संकलन आणि विक्री कार्याची माहिती दिली. तसेच किनारपट्टी भागातील घोलवड हे पहिले मधाचे गाव असल्यामुळे मध उत्पादनाच्या माध्यमातून गावाच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

हेही वाचा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल

घोलवड परिसर पर्यावरण समृद्ध असल्यामुळे इथे तयार होणाऱ्या मधामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी तयार होणारे मध हे एक ते दोन फुलांतून तयार होत असून घोलावड परिसरात विविध फुल आणि फळ झाडांमुळे मधाचा दर्जा उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात घोलवड मध्ये तयार होणाऱ्या मधाला एक वेगळी ओळख मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले उत्पन्न मिळवता येणार असल्याची आशा व्यक्त होत आहे.

हेही वाचा : अवकाळी पावसाचा वाडा तालुक्याला फटका, १५८९ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४९ लक्ष रुपयांचे नुकसान

“मध उत्पादनासाठी यापूर्वी गावातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन मधपेट्या वाटप करण्यात आल्या होत्या. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी उत्पादनात घट होऊन उत्पादन बंद पडले होते. या व्यवसायाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही तयारी करत असून सध्या कृषी विद्यालय कोसबाड येथे प्रशिक्षण घेण्याचे काम सुरू आहे. गावातील एक वर्गाचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून लवकरच इतर गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ग्रामपंचायत व मेघाश्रय संस्थेच्या मध्यामातून लोकांना मधपेट्या आणि प्रशिक्षण घेण्यासाठी सहकार्य करायचा प्रयत्न सुरू आहे”, असे घोलवडचे सरपंच रविंद्र बुजड यांनी म्हटले आहे.

Story img Loader