पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील दहिसर ते तलासरी दरम्यानच्या कॉंक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्या पावसात रस्त्याच्या अनेक भागात खड्डे पडले आहेत. काँक्रीट करण्याच्या पृष्ठभागावरील थर उखडून पडण्याची तसेच काही पॅनल पट्टे खराब होण्याचे प्रकार उघडकीस आले असून अनेक ठिकाणी रस्ता दबल्याने, फुटल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. नव्याने अंथरलेल्या काँक्रिटीकरणाच्या पृष्ठभागावरील थर उखडला गेल्यानंतर इपॉक्सी रेझिंन कोटिंग परिणामकारक ठरले नसल्याने आता मॅस्टिक अस्फाल्टीन्ग हा विशेष डांबरी थर अंथरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २०० मिलिमीटर जाडीचा काँक्रीट थर अंथरण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्प करून या कामासाठी ५५४ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला होता. या कामाला डिसेंबर २०२३ मध्ये आरंभ झाला होता. २०२४ च्या पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरणाचे सुमारे ३५ टक्के काम पूर्ण झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर झाले होते.
काँक्रिटीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मनोर पासून शिरसाड (विरार) दरम्यानच्या भागात काँक्रीट थर अंथरायला आरंभ केला होता. नेमक्या याच पट्ट्यात काँक्रीटमध्ये लहान मोठ्या आकाराचे व सहा इंच पासून नऊ ते १२ इंच खोलीपर्यंतचे खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी काँक्रीट पॅनलच्या टोकाच्या बाजूला असलेले कप्पे पूर्णपणे उखडून गेल्याचे व इतर काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या आकाराच्या भेगा त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे.
या महामार्गावर भरधाव येणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन अशा खड्ड्यांमध्ये आपटून आदळून अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत. अनेकदा वाहनांचे टायर पंचर होत असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी वाहन चालकाला १० ते १५ किलोमीटर अंतर जावे लागत आहे. विशेष म्हणजे नादुरुस्त होणाऱ्या वाहनांना तातडीने मदत पुरवण्यासाठी देखभाल दुरुस्तीसह टोल वसुलीचा ठेका घेणाऱ्या कंत्राटदाराकडून विशेष सुविधा प्राप्त असल्याने वाहन चालकाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकांवर काँक्रिटीकरण केलेले पट्टे उखळून जाण्याचे प्रकार तुलनात्मक अधिक असून गुजरात मार्गिकेवर देखील खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ५०- १०० फुटावर खड्डे पडले असून भर पावसात त्यांची दुरुस्ती आरंभली असल्याने या दुरुस्तीच्या कामांची कार्यक्षमता किती काळ राहील याबाबत देखील प्रश्नचिन्ह उभारले जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याशी संबंधित ठेकेदाराने पुढील १० वर्ष देखभाल दुरुस्ती करणे अभिप्रेत असून पहिल्याच वर्षी नव्या काँक्रीटकरणाची ही गत झाली असताना पुढील १० वर्षांचा काळ कसा काय निघेल असा प्रश्न या मार्गावरून नियमित प्रवास करणार्या वाहन चालकांसमोर पडला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराने या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी या रस्त्यांची दुरुस्ती कितपत कार्यक्षम पद्धतीने होईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इपॉक्सिक कोटिंगचा मुलावा
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वी या मार्गाची पातळी (लेवल) राखली गेली नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अवजड वाहन जाताना देखील त्यामध्ये बसणाऱ्या प्रवाशांना कंप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबरनी काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचा पृष्ठभाग उखडून गेल्याने कॉंक्रिट मधील खडी दर्शनीय भागातून दिसून येत होती. त्यावर उपाययोजना म्हणून सुमारे ४५ हजार चौरस मीटर क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराने एपॉक्सी कोटीग करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले होते. हे काम करणाऱ्या दोन ठेकेदारांपैकी एकाचे काम समाधानकारक रित्या टिकून राहिल्याचे दिसून आले असून निम्मा भाग पावसाळ्याच्या पहिल्या सत्रातच उखडून गेल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर काँक्रीटीकरण कामाच्या दर्जाचा प्रश्न कायम राहिला असला तरी त्याविषयी लोकप्रतिनिधी यांनी शांत राहण्याचे पसंद केल्याचे आजवर दिसून आले आहे.
मॅस्टिक अस्फाल्टीन्ग
लवकर परिपक्व होणारा चुन्याच्या अवशेषासह उच्च प्रतीचा डांबर अंथरणे म्हणजेच मॅस्टिक अस्फाल्टीन्ग असे संबोधले जात असून या विशिष्ट डांबरी पदार्थाचा चिकटपणा व लवचिकता या गुणधर्मामुळे तो अंथरल्यानंतर त्यामध्ये पाण्याचा शिरकाव होणे सहज शक्य होत नाही. काँक्रीटच्या खड्ड्याची सफाई करून त्यावर प्राथमिक कोटिंग केल्यानंतर प्रेशर कुकर सारख्या उपकरणात गरम करून मॅस्टिक अस्फाल्टीन्गचा थर अंथरला जातो. त्यावर पुन्हा चुना पावडर टाकून रोलिंग केल्यानंतर त्यावरून कमी वेळात वाहतूक पूर्ववत करणे शक्य होते. पावसाने उघडीप घेतल्यास मॅस्टिक अस्फाल्टीन्ग द्वारे खड्डे भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बाजू
काँक्रीट करण्याचे काम हाती घेतल्यानंतर आरंभी अनुभव तसेच समन्वयाच्या अभावे कामाचा दर्जा राखला गेला नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून मान्य करण्यात आले आहे. काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान होणारी वाहतूक कोंडी, खुल्या वाहनांमध्ये वाहतूक होणारे काँक्रीट व परिणामी सिमेंट पाण्याची होणारी गळती, रात्रीच्या वेळी काम सुरू असताना आवश्यक देखरेखीचा अभाव तसेच सुटणाऱ्या काँक्रीटला रस्त्यावर अंथरण्यापूर्वी अंदाजाने पाईपद्वारे मिसळण्यात येणारे पाणी यामुळे रस्त्याचा दर्जा राखला गेला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
काँक्रिटीकरण सुरू केल्यानंतर पहिल्या टप्प्यात संबंधित ठेकेदाराला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. प्रामुख्याने इतिहास काळात झालेल्या कामांमध्ये रस्ता फुटण्याचे अथवा काँक्रीट रस्त्यामध्ये खड्डे पडण्याचे प्रकार घडले आहेत. ठेकेदाराकडून हे खड्डे काँक्रीटच्या नवीन पॅनलद्वारे बदलण्याचे (दुरुस्तीचे) काम हाती घेण्यात आले असून पावसाने उघडीप घेतल्यानंतर ही काम लवकरच पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. इपॉक्सी रेझिंगचे कोटिंग करणे पूर्णपणे यशस्वी न झाल्याने नव्याने पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी मॅस्टिक अस्फाल्टीन्ग करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. – सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.
मॅस्टिक डांबर : हे डांबर आणि सूक्ष्म खनिज पदार्थांचे मिश्रण आहे. जेणेकरुन ते गरम ओतले जाऊ शकते आणि नंतर फरशी, छप्पर आणि फरशीसाठी गुळगुळीत पृष्ठभागावर हाताने ट्रॉवेलिंग करून कॉम्पॅक्ट केले जाऊ शकते. मॅस्टिक डांबर त्याच्या अपवादात्मक अभेद्यतेसाठी वेगळे आहे, तर पॉलिमर-सुधारित बिटुमेन त्याच्या विस्तृत तापमान कामगिरी आणि लवचिकतेमध्ये चमकतो.
मॅस्टिक डांबर स्क्रिडचे तोटे : तेल आणि सॉल्व्हेंट्सना कमी प्रतिकार आणि इतर स्क्रिडच्या तुलनेत त्याच्या मऊ पृष्ठभागावर आहेत (थर्मोप्लास्टिक गुणधर्म), जे विशेषतः कायमस्वरूपी कार्य करणाऱ्या पॉइंट लोड्स अंतर्गत जेव्हा मॅस्टिक डांबर पूर्ण दृश्यमान पृष्ठभाग असतो तेव्हा इंप्रेशन देऊ शकते आणि मिळवू शकते. काँक्रीट कार पार्किंग स्ट्रक्चर्स नेहमीच मॅस्टिक डांबराने चांगले संरक्षित केले आहेत. हे एक निर्बाध, पूर्णपणे जलरोधक थर प्रदान करते, जे काही तासांत तस्करी केले जाऊ शकते – ओलावा नसतो आणि म्हणून दीर्घ क्युअरिंग कालावधी नसतो.
सुरुवातीच्या स्थापनेच्या खर्चासाठी बिटुमेन सामान्यतः डांबरापेक्षा सुमारे ५० टक्के स्वस्त असते परंतु डांबर जास्त किफायतशीरता देते. डांबर अत्यंत टिकाऊ असल्याने देखभालीची आवश्यकता कमी असल्याने, दीर्घकाळात ते ड्राईव्हवेसाठी स्वस्त पर्याय ठरू शकते. मॅस्टिक डांबर पूर्वी अशा पद्धतींनी तयार केले गेले आहे ज्यामध्ये मॅस्टिक डांबराचे मुख्य घटक, ज्यामध्ये सामान्यतः बिटुमेन, चुनखडीचा ग्रिट आणि चूर्ण चुनखडीचा भराव असतो, मिसळले जातात आणि नंतर पुढील मिश्रणासाठी एकत्र गरम केले जातात.
मॅस्टिक अॅस्फाल्ट हे एक दाट मिश्रण आहे ज्यामध्ये खडबडीत गोळा, वाळू, चुनखडीचा बारीक गोळा, फिलर किंवा बिटुमेन असते, ज्यामध्ये अॅडिटिव्ह्ज (उदाहरणार्थ पॉलिमर, मेण) असू शकतात. हे मिश्रण कमी पोकळीचे असावे यासाठी डिझाइन केले आहे. बाइंडरचे प्रमाण इतके समायोजित केले आहे की पोकळी पूर्णपणे भरली जातात आणि बाइंडरचा थोडासा जास्त वापर देखील होऊ शकतो. मॅस्टिक अॅस्फाल्ट ओतता येतो आणि त्याच्या कार्यरत तापमानाच्या स्थितीत पसरवता येतो. त्याला साइटवर कॉम्पॅक्शनची आवश्यकता नाही. मिश्रणाची ताकद कोणत्याही एकत्रित इंटरलॉकपेक्षा बिटुमेनपासून असते. बाईंडरचे प्रमाण अशा प्रकारे समायोजित केले जाते की पोकळी पूर्णपणे भरली जातात. स्किड प्रतिरोधक प्री-लेपित चिपिंग्ज किंवा बारीक गोळा पृष्ठभागावर एम्बेड करून पोत (स्किड रेझिस्टन्स) सुधारता येते.