पालघर : जिल्ह्यात सध्या विविध पंचायत समितींच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सोमवार १३ ऑक्टोबर रोजी या निवडणुकांसाठी त्या-त्या पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षण सोडत काढण्यात आली. यामुळे आता जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी यांच्यासह भाजप, काँग्रेस आणि मनसे यांच्यात कशी लढत रंगणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तलासरीत १० जागांचे आरक्षण
तलासरी पंचायत समितीमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी असणाऱ्या सर्व १० जागांकरिता तहसीलदार अमोल पाठक यांच्या अध्यक्षतेखाली गण सदस्य आरक्षण सोडत पार पडली. यावेळी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी ९ आणि खुल्या प्रवर्गासाठी एक पद आरक्षित ठेवण्यात आले आहे. यातील निम्म्या म्हणजे ५ जागा महिलांकरिता राखीव आहेत.
पंचायत समिती गणनिहाय आरक्षण
अनुसूचित जमाती
अनवीर, झरी, वसा, वडवली
अनुसूचित जमाती (महिला)
उपलाट, सूत्रकार, डोंगारी, घीमानिया, झाई
सर्वसाधारण
सागरशेत
डहाणूत २६ जागांसाठी लढत
डहाणू पंचायत समितीमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी असणाऱ्या सर्व २६ जागांकरिता आरक्षण सोडत पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली. यावेळी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी एक, सर्वसाधारण महिलांसाठी तीन आणि खुल्या प्रवर्गासाठी दोन पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत. गणाच्या निम्म्या म्हणजे १३ जागा महिलांकरिता राखीव आहेत. डहाणू तहसीलदार सुनील कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली.
पंचायत समिती गणनिहाय आरक्षण
अनुसूचित जमाती
निकने, रायपुर, रामपूर, भिसेनगर, बोर्डी, दाभोन, दापचारी, आशागड, मुरबाड, आंबोली
अनुसूचित जमाती (महिला)
चळणी, शेणसरी, चारोटी, साखरे, कैनाड, मोडगाव, आंबेसरी, वंकास, वनई, सरावली
नागरिकांचा मागास प्रवर्ग –
आगवन
सर्वसाधारण (महिला) –
चिखले, वाणगाव, धाकटी डहाणू
खुला गण
चिंचणी, वरोर
पालघरमध्ये ३४ गण
पालघर : पालघर पंचायत समितीमधील सर्व ३४ जागांकरिता आरक्षण सोडत तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी अनुसूचित जातीकरिता एक, अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी ११, नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी नऊ तर सर्वसाधारण महिलांसाठी पाच पद आरक्षित ठेवण्यात आले आहे. गणाच्या निम्म्या म्हणजे १७ जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
गणनिहाय आरक्षण
अनुसूचित जाती (महिला): पास्थळ
अनुसूचित जमाती : बऱ्हाणपूर, गुंदले, नंडोरे, धूकटण व केळवा
अनुसूचित जमाती (महिला): शिगाव, हालोली, कोसबाड, दहिसर तर्फे मनोर, निहे व सोनावे
नागरिकांचा मागास प्रवर्ग : माहीम, माकुणसार, सातपाटी व उमरोळी
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : सालवड, सरावली (धोडीपूजा), खैरापाडा, मनोर व शिरगाव
सर्वसाधारण महिला : कुरगाव, दांडी, काटकरपाडा (बोईसर), वंजारपाडा (बोईसर) व सरावली
खुला गण : तारापूर, नवापूर, बोईसर, दांडीपाडा (बोईसर), मुरबे, एडवण, टेंभीखोडावे व उंबरपाडा (नंदाडे)
वाडा पंचायत समिती व जिल्हा परिषद आरक्षण जाहीर
वाडा पंचायत समितीमधील १२ जागांकरिता गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी ०७ जागा असून त्यापैकी ०३ जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत.
तर सर्वसाधारणमध्ये ०४ जागांपैकी ०२ जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी (ओबीसी) ०१ जागा राखीव ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जाती उमेदवारांसाठी कुठलीही जागा नाही.
सदर आरक्षण सोडत ही वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वाडा पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली. या आरक्षण सोडतीला तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाडा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
गणनिहाय आरक्षण
आरक्षण प्रवर्ग — जागा — गण
अनुसूचित जमाती : (०३) वरसाले, गांधरे, गालतरे
अनुसूचित जमाती (महिला राखीव): ०४
डाहे, कोने, बिलोशी, अबिटघर
सर्वसाधारण प्रवर्ग – (०२)- गोऱ्हे, चिंचघर
सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी राखीव- ०२
खुपरी, कुडूस
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – ०१- खानिवली