वसई: पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडातील मृत साधूंच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. शनिवारी विरार येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात या साधूंच्या कुटुंबीयांची मुखमंत्र्यांनी भेट घेतली आणि ही मदत देण्यात आली.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच वसई विरारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. नुकतीच शिवसेनेला मान्यता मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह जोरात होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘घर तिथे शिवसेना आणि गाव तिथे शिवसेना’ अशी घोषणा देऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – शहरबात : होऊन जाऊ दे खर्च

तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधूंची हत्या करण्यात आली होती, या साधूंच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मेळाव्यात त्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी साधूंच्या कुटुंबियांना भेटही नाकारली होती, मात्र आमची खरी शिवसेना असल्याने आम्ही साधुसंतांचा सन्मान करतो, असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – मोक्का गुन्हा लावलेल्या टोळी सदस्यांना अटक करण्यास पालघर पोलिसांना यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनाला हजेरी लावली. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर कोपरखळ्या देत हल्ले केले. माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या आहेत, दाढीवर हात फिरवला की अनेकांना धास्ती वाटते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकाना चिमटा काढला.