पालघर : मोखाडा तालुक्यातील आठ शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली  सामूहिक बटाटा लागवडीचा पथदर्शी उपक्रमशील प्रयोग केला आहे.   पहिल्यांदाच दोन एकरांत हा पथदर्शी उपक्रम राबविला आहे. आरोहण संस्थेने या उपक्रमात महत्त्वाचे योगदान दिले आहे. जव्हार, मोखाडा तालुक्यात बटाटा पिकासाठी पोषक वातावरण आहे. या लागवडीमुळे पिकाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या स्रोतासाठी चांगलाच फायदा होणार आहे. हिवाळय़ात या डोंगराळ भागात जास्त दिवस थंडी असते. बटाटा पिकासाठी हे हवामान पूरक आहे. तसेच मध्यम प्रतीची, खोलीची, भुसभुशीत, कसदार, उत्तम निचरा होणारी जमीन येथे आहे. डहाणूच्या कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी  शेतकऱ्यांना बटाटा लागवडीविषयी माहिती देत, मार्गदर्शन केले.  त्याआधारे आडोशी आणि शिरसगाव येथील आठ आदिवासी शेतकऱ्यांनी डिसेंबर ते जानेवारी काळात दोन एकर क्षेत्रांत बटाटा लागवड सुरू केली. निम्म्या शेतकऱ्यांनी गादीवाफा आणि सरी वरंबा पद्धत वापरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बटाटा पीक ९० दिवसांच्या कालावधीचे पीक आहे.  लागवडीसाठी बटाटय़ाचे कंद ३० ते ५० ग्रॅम वजनाचे असावे लागते. प्रति हेक्टरी साधारणत: २५ क्विंटल बियाणे लागते. लागवडीचा हंगाम, जमीन, पिकाची जात आदींवर उत्पादन अवलंबून असून लवकर येणाऱ्या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी २० टन येते. चांगल्या प्रतीच्या बटाटय़ाला बाजारात लिलाव प्रक्रियेत चांगला दर मिळतो.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilot experiment potato cultivation ysh
First published on: 09-02-2022 at 00:31 IST