पालघर :रेडी मिक्स काँक्रीट अर्थात आरएमसी च्या वाहतुकी दरम्यान चढणावर व रस्त्यावर सांडणाऱ्या कॉंक्रीट पदार्थांमुळे वाहन चालकाला उपद्रवाला सामोरे जावे लागत असून यामुळे अनेक अपघात घडले आहेत. यासंदर्भात लोक दरबार मध्ये तक्रार नोंदविल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्लांट धारकांना नोटीस बजावली आहे.

बोईसर पूर्वेकडील गुंदले, नागझरी, रावते व इतर भागांमध्ये आरएमसी चे आठ ते दहा प्लांट असून त्यामधून तयार काँक्रीट ची वाहतूक करताना गुंदले येथील चढण व वळण क्षेत्रात तसेच पश्चिम रेल्वे वरील उड्डाणपुलावर अनेकदा आरएमसी रस्त्यावर पडत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांवर त्याचे शिंतोडे उडतात. त्याचप्रमाणे या आरएमसी मुळे वाहन चालकांना व विशेषतः दुचाकी चालकांना मोठ्या उपद्रवाला सामोरे जावे लागत असे यामुळे अपघात होत असतात.

त्याचबरोबर आरएमसी वाहनातून काँक्रीट रिकामी केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून असे सिमेंट युक्त पाणी अनेकदा रस्त्याच्या कडेला अथवा शेतामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे देखील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.

या संदर्भात एका समाजसेवकाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या लोकदरबार मध्ये तक्रार नोंदवली होती. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने बोईसर पूर्वेकडील आरएमसी उत्पादकाला नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे ही नोटीस बजावल्यानंतर बोईसर पूर्वेकडी दोनही चढणावर पडलेले अतिरिक्त आरएमसी तातडीने साफ करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला असता आरएमसी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून काँक्रीट बाहेर पडले तर संबंधित वाहन चालकांविरुद्ध तसेच उत्पादकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे लोकसत्ताला सांगितले

आरएमसी बाहेर का पडते

काही प्रसंगी आरएमसी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक काँक्रीट भरण्यात येते तर चढणावर वाहनामध्ये गिअर बदल करताना वाहनाला बसणाऱ्या झटक्यामुळे काँक्रीट बाहेर पडल्याचे प्रकार घडत असतात. हे प्रकार अनेकदा होऊ लागल्याने बोईसर येथील एका व्यवसायिकांनी बोईसर पूर्वेकडील वाघोबा घाटामध्ये पडणारे काँक्रीट धुवून निघावे म्हणून स्प्रिंकलर व्यवस्था बसवली असल्याची माहिती पुढे आली आहे.

आर एम सी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आवश्यक

आरएमसी ची वाहतूक करणारी पालघर तालुक्यात १०० पेक्षा अधिक वाहन कार्यरत असून काँक्रीट वाहतूक करताना ही वाहन अनेकदा भडगाव जात असल्याने अपघात घडत असतात. अलीकडे झालेल्या अवकाळी पावसात एक काँक्रीट ने भरलेले वाहन माकुणसार जवळील वळण असलेल्या रस्त्यावर उलटले होते. तर रिकामी वाहन अत्यंत वेगाने चालवली जात असून त्यामधून उडणारे सिमेंट पाण्याची शिंतोडे मागून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत असतात. अशा वाहनांच्या वेगावर पोलीस व इतर यंत्रणे मारतात नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.