वसई : विरार येथे विजेच्या धक्क्याने दोनजणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी विरारच्या नारंगी बायपास रस्त्यावर एक ट्रक उलटल्याने भीषण अपघात घडला आहे. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक उलटून खाली दाबल्या गेलेल्या तीनजणांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास विरारच्या नारंगी फाटकापासून ग्लोबल सिटीच्या दिशेने हा ट्रक जात होता. समोरून भरधाव वेगाने दुचाकी येत होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचविण्यात ट्रकचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याकडेला उलटला. हा ट्रक थेट रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर कोसळल्याने तीनजणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – पालघर: तलाठी महेशकुमार कचरे याला दहा हजाराची लाच घेताना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्नाळा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यास सुरवात केली आहे