वाडा : विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावातील विक्रांत युवा मित्र मंडळ आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी गणेशोत्सवात ‘ऑपरेशन सिंदूर’ देखावा साकारला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा एक देखावा असून तो भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि शौर्यगाथेला समर्पित आहे. ज्यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे. देखाव्यातून भारतीय सैन्याचे शौर्य, बलिदान आणि मातृभूमीचे प्रतिक दर्शवले आहे. ज्यात रणगाडे, तोफा आणि जेट विमाने भारतीय सैन्याचे सामर्थ्य दर्शवणारे देखावे उभारला आहे. लष्काराचे महत्व देखाव्याद्वारे सादर केले आहे. भारतीय लष्काराचे सामर्थ्य व महत्व विषद करण्यासाठी तसेच जनजागृती साठी विक्रांत युवा मित्र मंडळा मार्फत या वर्षी देखावा सादर केला आहे.
विक्रांत युवा या मंडळाचे सात दिवसांच्या गणेशोत्सवाचे १०८ वे वर्ष असुन देखावा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणाईत देशभक्ती जागृत करून लष्काराचे भारतीय सैन्याचे शौर्य, बलिदान याचे महत्व तसेच देशाविषयी निष्ठा व प्रेम वाढवे या दृष्टीने प्रयत्न केला गेला असे मंडळाच्या सदस्यांनी नमूद केले. यंदा मंडळाच्या गणेश उत्सवाला १०८ वर्ष पूर्ण झाली आहेत. सामाजिक दृष्टी कोनातून आगळा- वेगळा सामाजिक संदेश देणारा व देखावा साकार करणारे विक्रमगड तालुक्यातील पहिले व जुने मंडळ आहे.
दरवर्षी सामाजिक विषय घेऊन देखावे व जनजागृती करणारे विक्रमगड तालुक्यातील एकमेव सर्वात जुने मित्र मंडळ अशी ख्याती आहे. या मंडळाने २००४ मधे एड्स जनजागृती देखावा ठाणे जिल्ह्यात प्रथम पारितोषिक तर २००६ मधे व्यसन मुक्ती, आकर्षक देखाव्यासाठी विक्रमगड पोलिस ठाण्यात तालुक्यात प्रथम पारितोषिक मिळवले आहे. आठ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक आकर्षक देखावा स्पर्धा ( महाराष्ट्र शासन) स्पर्धेत भाग घेतला होता. तर सात वर्षांपुर्वी किल्ले संवर्धन देखाव्या शेजारी विविध प्रकारची किल्ले संवर्धन संदेश देणारी पोस्टर लावली आहेत. त्याचप्रमाणे देखाव्या शेजारी विविध किल्लाचा इतिहास याचे पोस्टर देखील मंडळाने सादर केली. सहवर्षांपूर्वी या मंडळांने “बेटी बचाव बेटी पढ़ाव” मनाला स्पर्श करणारा देखावा तयार केला होता.
पाच वर्षांपूर्वी “प्लास्टिक बंदी” लोक जनजागृती उपक्रम देखावा सादर केला. तर चार वर्षांपुर्वी “मानवी हस्तेक्षेप” आणि “पर्यावरणाचा ऱ्हास” जनजागृती उपक्रम देखावा सादर केला. तीन वर्षांपूर्वी ‘कोरोना योद्धाना सलाम’ लोक जनजागृती देखावा सादर केला होता. दोन वर्षांपूर्वी चंद्रयान-3 देखावा सादर करून भारतीय इस्रोच्या शास्त्रज्ञाचे कौतुक केले होते. तर गेल्या वर्षी “अपारंपारीक ऊर्जा स्रोत” जन जागृती’ देखावा साकारला होता. याद्वारे देशात अपारंपारीक ऊर्जा स्रोतला महत्व वाढले असून सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल विद्युत याचे महत्व देखाव्या द्वारे सादर केले होते.
या गणेशोत्सवा काळात दररोज रात्री सांस्कृतीक कार्यक्रम व कला-क्रीड़ा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच मंडळा मार्फत इतर उपक्रम राबवले जात असुन रक्त दान शिबीर ही आयोजन करण्यात आले होते. देखाव्याला भेट दयावी व या देखाव्याचा आनंद घ्यावा असे आवाहन विक्रांत युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, ओंदे ग्रामस्थ यांनी केले आहे.