-
झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.
-
या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला.
-
आता त्या जागी ‘अग्गंबाई सूनबाई’ ही नवी मालिका सुरु होणार आहे.
-
अग्गंबाई सूनबाई या मालिकेत ‘शुभ्रा’च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा तर काहींसाठी नवखा वाटणारा उमा पेंढारकर हा चेहेरा दिसणार आहे.
-
अग्गंबाई सूनबाई या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानने शुभ्रा ही भूमिका साकारली होती.
-
आता उमा पेंढारकर 'अग्गंबाई सुनबाई' मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार आहे.'
-
मुळात एक काऊंसिलर असलेल्या उमाचा 'अग्गंबाई सूनबाई' पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.
-
डोंबिवलीकर उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं.
-
अद्वैत दादरकरचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला.
-
त्यात ती पहिली आली.
-
प्रशांत दामलेंकडून उमाला पुरस्कार मिळाला.
-
तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला.
-
तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं.
-
याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे.
-
त्यामुळे ती काउंसिलिंगचे काम मोठया जबाबदारीनं करते.
-
उमाने 'स्वामिनी' या मालिकेत पार्वतीबाई यांची भूमिका साकारली होती.
-
उमाचं लग्न झालं आहे.
-
तिच्या पतीचे नाव ऋषीकेश पेंढारकर आहे.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक