
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील टॉपचा कलाकार म्हणून रामचरणची ओळख आहे.
राम चरण त्याच्या चित्रपटांसाठी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतोच. पण त्याचबरोबरीने त्याच्याकडे कोटी रुपयांची संपत्ती आहे.
राम चरण राहत असलेल्या बंगल्याची किंमत जवळपास ३८ कोटी रुपये इतपत आहे.
त्याचा हा बंगला हैद्राबादमधील सगळ्यात महागडा परिसर जुबली हिल्स या ठिकाणी आहे.
शिवाय राम चरणने मुंबईमध्ये देखील महागडं घर खरेदी केलं आहे.
हा सुप्रसिद्ध अभिनेता जवळपास १३०० कोटी रुपयांचा मालक आहे.
राम चरणकडे Rolls Royce Phantom ही सगळ्यात महागडी कार आहे. त्याचबरोबरीने ब्रिटीश स्पोर्ट्स कार देखील तो वापरतो. बीएम डब्ल्यु, मर्सिडिज, रेंज रोव्हर सारख्या महागड्या कार देखील त्याच्याकडे आहेत.
इतकंच नव्हे तर तो ट्रु जेट एअरलाइन्सचा देखील मालक आहे.
भारतातील सगळ्यात महागड्या कलाकारांमध्ये राम चरणचाही समावेश आहे. ‘आरआरआर’ चित्रपटासाठीच त्याने ४५ कोटी रुपये इतपत मानधन घेतलं होतं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)