
आज बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे काही कलाकार हे एकेकाळी टीव्हीसाठी अँकरिंगचं काम करायचे. या ठिकाणी नाव कमावल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवलं.
अगदी आयुष्मान खुराना ते सोफी चौधरी पर्यंत अनेक कलाकारांनी अँकरिंग सोडून अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात केली. अर्थात काही हिट झाले तर काही मात्र एक दोन चित्रपटांनंतर या क्षेत्रातून बाहेर गेले.
अभिनेता आयुष्मान खुराना रोडीज विनर झाल्यानंतर बराच चर्चेत आला होता. त्यानंतर काही बरेच टीव्ही शो होस्ट केले. तसेच आयपीएलच्या तिसऱ्या सीझनसाठी अँकरिंगही केलं. आज आयुष्मान बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.
आयुष्मानचा भाऊ अपारशक्ती खुरानाने देखील बऱ्याच टीव्ही शोसाठी अँकरिंग केलं आहे. वीजे म्हणून त्यानं बरंच नाव कमावलं आहे. त्यानंतर त्यानं काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारूनही बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.
अनेक वर्ष रोडीज हा लोकप्रिय शो होस्ट करणारा अभिनेता रणविजय आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेत.
गौरव कपूर हा टीव्ही जगतातील प्रसिद्ध होस्ट आहे. टीव्ही अँकरिंगमध्ये प्रसिद्धी आणि नाव कमावणाऱ्या गौरव कपूरची अभिनय कारकिर्द मात्र फ्लॉप ठरली.
एमटीव्हीची होस्ट सोफी चौधरीनं देखील नंतर चित्रपटसृष्टीत आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत.
पूरब कोहली एकेकाळचा टीव्ही जगतातील अँकरिंगमधील आघाडीचा होस्ट होता. त्याने नंतर चित्रपटांमध्येही काम केलं. त्याचे काही चित्रपट हीट झाले मात्र या क्षेत्रात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
अभिनेता मनिष पॉल एक उत्तम अँकर मानला जातो. ‘संडे टँगो’ या शोमुळे तो चर्चेत आला होता. चित्रपटांमध्ये मनिष फार यशस्वी ठरला नसला तरीही त्याला चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मात्र मिळाली.