-
हिंदी मालिका विश्वात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये या अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम केला आहे.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका २००८ साली सुरु झाली. वर्षानुवर्षे हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. शोमध्ये असे अनेक स्टार्स होते, जे त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा त्यांच्या पात्रांसाठी ओळखले जातात. मात्र, या कलाकारांनी काही कारणांमुळे हा शो सोडला आहे.
-
जेठालालचा मुलगा टप्पूची भूमिका करणारा राज अनडकट बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसला नाही. अखेर राजने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून, तो ही मालिका सोडत असल्याचे जाहीर केले. त्याने ही मालिका सोडण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.
-
सोनूची भूमिका साकारणाऱ्या निधी भानुशालीनेही या मालिकेला निरोप दिला आहे. ती सहा वर्षे या शोचा भाग होती.
-
‘दयाबेन’ या पात्रामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिशा वकानी गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेपासून दूर आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर दिशाने शो सोडण्याची घोषणा केली होती.
-
बागाची प्रेयसीची भूमिका बजावलेली अभिनेत्री मोनिका भदोरियानेही शो सोडला आहे. मोनिकाने एका चांगल्या नोटवर शोचा निरोप घेतला.
-
तारक मेहताची पत्नी अंजलीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताने काही काळापूर्वी शो सोडल्याचा खुलासा करत निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. १२ वर्षे या मालिकेमध्ये काम करणाऱ्या अंजलीने सांगितले की, निर्मात्यांनी तिला सहा महिन्यांचा पगार दिला नाही.
-
सोढीच्या भूमिकेत अभिनेता गुरचरणनेही प्रेक्षकांना खूप हसवले. मात्र, २०२० मध्ये त्यानेदेखील ही मालिका सोडली. निर्मात्यांशी भांडण झाल्याने त्याने शो सोडला असल्याचे सांगण्यात येते.
-
‘तारक मेहता’ची भूमिका साकारणारा शैलेश लोढा यानेही काही महिन्यांपूर्वीच मालिका सोडली आहे. निर्माता असित मोदी यांनी याबाबत खुलासा केला होता. दरम्यान, शैलेश अप्रत्यक्षपणे असित मोदींवर निशाणा साधताना दिसतो.
जगभरातल्या श्रीमंतांमधला अदाणी-अंबानींचा दबदबा संपला? टॉप १० मधून बाहेर, पाहा नवीन यादी