-
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या कथेबरोबरच चर्चेत असतो तो दीपाचा मेकअप.
-
अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत ‘दीपा’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेतली दीपा सावळी दाखवली आहे पण खऱ्या आयुष्यात रेश्मा त्यापेक्षा थोडी गोरी आहे. त्यामुळे दरवेळी तिला भरपूर मेकअप करावा लागतो.
-
सरडा जसा रंग बदलतो तसा प्रत्येक एपिसोडला दीपाच्या चेहऱ्यावरचा रंग ही बदलतो असंही आधी म्हटलं गेलं.
-
तर आता या मालिकेत नुकताच दीपा आणि कार्तिक यांचा विवाहसोहळा पार पडला.
-
दीपा-कार्तिक यांच्या लग्न सोहळ्यातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यावर प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
लग्नाच्या एपिसोडच्या वेळी दीपा अचानक गोरी दिसायला लागली असं अनेकांनी म्हटलं.
-
त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “दिग्दर्शक आणि मेकअप मॅन बदललेले बहुतेक… नाहीतर आधीचा चेहऱ्याचा रंग आणि आत्ताचा… असो दिल्या घरी तू सुखी राहा.”
-
तर दुसऱ्याने लिहिलं, “लग्नाची हळद लागल्यावर रंग उजळला वाटतं.”
-
त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा दीपाच्या चेहऱ्यावरचा रंग हा चर्चेचा विषय ठरत आहे
VIDEO : कॅनडात खलिस्तान समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ चालवला, काँग्रेससह परराष्ट्र मंत्र्यांचा संताप, उच्चायुक्त म्हणाले…