११ ऑगस्टपासून उत्तर भारतात अशुभ मानला जाणारा महिना सुरू होत आहे. हा महिना सुरू होण्याआधी जेडी(यु) भाजपाशी काडीमोड घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या याच महत्त्वाकांक्षेला इशारा देत त्यांचे जुने सहकारी आर.सी.पी सिंग यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की “नितीश कुमार यांनी २००५ ते २०१० या कालावधी दरम्यान बिहारसाठी सर्वोत्तम कामगिरी केली होती. कारण तेव्हा त्यांचे लक्ष फक्त राज्यावर होते. पण त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले. जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या इच्छा पूर्ण करू लागते, तेव्हा असंच होतं”.

पक्षाने राज्यसभेचे तिकीट नाकारले म्हणून आर.सी.पी सिंग यांनी रविवारी जेडी(यु)चा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत त्यांच्यावर आरोप केले होते. नितीश यांच्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची दखल बिहारमधील घराघरात घेतली जाण्याची शक्यता आहे. कारण एकेकाळी ते नितीश कुमार यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. नितीश यांनी २०१७ मध्ये एनडीएमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी काँग्रेस आणि आरजेडीसोबत महागठबंधन प्रयोग केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पण त्यातून काहीच हाती लागले नाही. तोपर्यंत यूपीएचे राष्ट्रीय संयोजक म्हणून उदयास येण्याच्या नितीश यांच्या आशा पूर्णपणे मावळल्या होत्या.२०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा बिहारमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी आरजेडी त्यांच्यापेक्षा फक्त एक जागेने पुढे आहे आणि जेडी(यु)च्या खूप मागे आहे. त्यामुळे सध्या बिहारचे राजकारण कुठले वळण घेते याची राजकीय चर्चा सुरू आहे.