खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी २९ नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशमधील महाकाल मंदिरात जाऊन भगवान शिवा आणि आणि नंदीचे दर्शन घेतले. दरम्यान राहुल गांधी यांच्या याच महाकाल मंदिराच्या भेटीवर भाजपाने सडकून टीका केली आहे. भाजपाने राहुल गांधी यांच्या शिवदर्शनाला गुजरात निवडणुकीशी जोडलं आहे.

हेही वाचा >>> CM शिंदेंची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; म्हणाले, “मूग गिळून…”

राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये भगवान शिवा यांचे दर्शन घेतल्यानंतर भाजपाने टीका केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांना ‘चुनावी हिंदू’ म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांचे हिंदुत्व फक्त निवडणुकीदरम्यानच समोर येते, असेही मालवीय म्हणाले आहेत. तसेच राहुल गांधी फोटोग्राफरला मंदिरात घेऊन गेल्यामुळे भाजपाने आक्षेप व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> Gujarat Election: “मोदी गेले म्हणजे…”; रवींद्र जडेजानं शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान मध्य प्रदेशमध्ये वेगेवगळ्या मंदिरांना भेट देत आहेत. त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी महाकालेश्वर मंदिरात देवाचे दर्शन घेतले. पुढील वर्षी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या यात्रेदरम्यान गांधी यांनी बुधवारी मंदिर, साधू यांचांही उल्लेख केला. “मागील तीन महिन्यांपासून मी तपस्या करत आहे. मात्र माझी तपस्या ही शेतकरी, कामगार या खऱ्या तपस्वींच्या तुलनेत खूप छोटी आहे,” असे राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान, भारत जोडो यात्रा येत्या ४ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी राजस्थान काँग्रेसकडून तयारी केली जात आहे.