दिगंबर शिंदे

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगली दौर्‍यामध्ये आगामी निवडणुकीची रणनीती निश्‍चित करण्यासाठी झालेल्या जिल्हा सुकाणू समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यपध्दतीचा पंचनामाच अधिक ठळकपणे दिसून आला. बावनकुळे यांचा पुर्वनियोजित दौरा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणि एकसंघ भाजप असे चित्र रंगविण्याचे प्रयत्न झाले तरी सुकाणू समितीच्या बैठकीत तक्रारीचा पाढा वाचला गेला. खुद्द पालकमंत्री खाडे यांनी मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून प्रशासकीय पातळीवर हस्तक्षेप होत असल्याचे तक्रार केली तर सुकाणू समितीतील जेष्ठ सदस्यांनी रखडलेल्या जिल्हा व तालुका समिती नियुक्तीवरून आणि निधी वाटपावरून पालकमंत्री खाडे यांच्या विरूध्द तक्रारी केल्या.

BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Uddhav Thackeray campaign aggressively against 40 rebel MLAs and hold meetings in Bhiwandi Rural
फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा
Jitendra Awhad on Ajit Pawar
Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके

बावनकुळे यांनी सातारा जिल्हा दौरा केल्यानंतर तासगाव, मिरज आणि इस्लामपूर याठिकाणी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका, रोडशो, जनसंवाद आदी माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच विकासाचाच नव्हे तर भाजपच्या विजयाचा चेहरा असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला. अगदी रस्त्यावरील भेळपुरी विक्रेत्यापासून सामान्य माणसाशी संवाद साधून पुन्हा मोदींचा नारा किती गरजेचा आहे हे सांगण्यात प्रयत्न केला. तत्पुर्वी तासगावमध्ये खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या तीन मतदार संघातील तीन मतदान केंद्राची जबाबदारी असलेल्या योध्दा (वॉरियर्स) कार्यकर्त्यांशी हितगूज केले. त्यांना लोकसभा निवडणुकीतील काम करण्याचे कानमंत्र दिला.

आणखी वाचा-आदिती तटकरे यांच्याकडून पालकमंत्री पदाच्या वादावर पडदा

जाहीर सभेत बावनकुळे यांनी संवाद साधत मोदी महात्म्य कथन करीत असताना मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चंद्रावर तिरंगा फडकविण्याचा पराक्रम केला आहे असे सांगत असताना पुढील काळात जैव इंधनाच्या वापराने वाहतूक व्यवस्था स्वस्त असल्याचे मतदारांच्या कानी सांगण्याचा प्रयत्न केला. एकंदरित निवडणुकीची तयारी सहा महिने अगोदरपासूनच सुरू केली असून एकेक जागा पक्षाला महत्वाची आहे हे दिसून आले.

दुसर्‍या बाजूला मिरजेतील विश्रामधामवर सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार, आजी माजी आमदार, लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, आजी, माजी जिल्हा प्रमुख यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत दिवसभराच्या दौर्‍याच्या यशापयशाची चर्चा न होता, पालकमंत्री खाडे यांच्या कारभाराबाबत नाराजीच नव्हे तर तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडी, तालुका पातळीवरील शासकीय समित्यांची नियुक्ती रखडली आहे. मित्र पक्षांना सत्तेत किती सहभागी करून घ्यायचे आणि भाजप कार्यकर्त्यांना किती स्थान द्यायचे याचाच निर्णय होउ शकलेला नाही. तसेच निधी वाटपातील असमानतेबाबत तर तक्रारी होत्याच, पण याचबरोबर मंजूर कामांचा निधीही पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून अडविण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्ष विस्तार करीत असताना तालुका पातळीवरील पदाधिकार्‍यांनी जर एखाद्या कामाचा प्रस्ताव देउन मंजूर केला असला तरी त्याला आडकाठी आणण्याचे काम केले जात असून यामुळे पक्ष विस्ताराला गती रोधक बसत असल्याची तक्रार होती.

आणखी वाचा-हरियाणामध्ये ‘आप’चा स्वबळाचा नारा; पंजाबमधील मंत्रिमंडळावर लोकसभेची जबाबदारी

जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही आमच्या तालुक्यासाठी वेळ दिला जात नाही, मात्र मिरज मतदार संघातील गल्लीबोळातील कामाच्या उद्घाटनासाठी वेळ दिला जातो. गणेशोात्सवाच्या काळात मिरज मतदार संघातील बहुसंख्य मंडळाच्या आरतीला उपस्थिती लावलीच, पण काही घरगुती गणेश दर्शनासाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला. अशाने पक्षाचा विस्तार कसा होणार आणि लोकसभेतील विजयाचा रथ कसा हाकणार असा सवाल उपस्थित करण्यात आला.

तर याच वेळी पालकमंत्री खाडे यांनी महायुतीतील मित्र पक्षाकडून कामात हस्तक्षेप होत असल्याची तक्रार करीत असताना ही तक्रार वरिष्ठ पातळीवर केली तर दखल घेतली जात नसल्याची तक्रार केली. भाजपमध्ये होत असलेल्या तक्रारी आणि घटक पक्षाकडून होत असलेली कोंडी पालकमंत्री खाडे यांना भेदणे अशक्य असल्याचीच एकप्रकारे कबुली दिली गेली असेच म्हणावे लागेल.

आणखी वाचा-विदर्भात पालकमंत्रीपदावर भाजपचाच वरचष्मा

माजी आमदाराची पाठ

जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी सुकाणू समितीच्या बैठकीबरोबरच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौर्‍याकडे पाठ फिरवली. त्यांनी स्पष्टच सांगितले आहे की, लोकसभेचा उमेदवार बदलणार असाल तर मी भाजपसोबत अन्यथा वेगळा विचार करण्याची आपली मानसिकता तयार आहे. म्हणजे जर पक्षाने त्यांचे ऐकले नाही तर कोंडी करण्याचा त्याचा स्पष्ट इरादा दिसत आहे. अशा माणसांना पालकमंत्री निधी वाटपात झुकते माप देणार असतील तर त्याचा पक्षाला किंबहुना लोकसभा निवडणुकीतील फायदा होणार आहे का? दसर्‍यापर्यंत मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे यावेळी अपेक्षित बदल पाहण्यास मिळतील असे सांगून प्रदेशाध्यक्षांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी जालीम उपाय होतो की पुन्हा मागच्या पानावरून पुढे असेच चालते हे पाहणे रंजक आहे. जर पक्षांतर्गत नाराजीवर वेळीच दवापाणी केले नाही तर लोकसभा निवडणुकीत याचे उत्तर मतदार आणि नाराज देतील.