सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : शिकवणी वर्गाचे भरमसाठ शुल्क, ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जाणवणारी वसतिगृहाची समस्या हे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती घ्यावी, अशी अपेक्षा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

मराठवाड्यातील दौऱ्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत ठाकरे हे विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी आले होते. छोट्या पक्षातील गटातटांत विभागलेल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत त्यांनी तुळजापूर, परळी वैजनाथ, नारायणगड, भगवानगड येथे जाऊन दर्शन घेतले. पक्षासाठी नवे चेहरे त्यांना सापडले असावेत असे मानले जात आहेत.

हेही वाचा : शिवसेना, ढाल तलवार आणि माने घराणे ; दोन तपानंतर पुन्हा जोडले नाते

भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळ देण्याच्या वृत्तीमुळे आणि नव्या राजकीय परिस्थितीमध्ये तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा लातूरचे मनसेचे शिवकुमार नागराळे यांनी केला. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गटात ताकद असणारा कार्यकर्ता अमित ठाकरे यांना घेऊन जात आहेत. त्यांचे स्वागत केले जाते. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या बैठका होत आहेत, असे चित्र मराठवाडाभर होते. विविध महाविद्यालयांकडून आणि शिकवणी वर्गाकडून आकारली जाणारे शुल्क ही मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यावर महाविद्यालयातून उत्तर शोधायला मदत करा, अशी मागणी अमित ठाकरे यांच्याकडे केली जात आहे. विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्यातील एक बनून ते संवाद साधत असल्याने येत्या काळात मनसे विद्यार्थी सेनेचे काम वाढेल असा दावा केला जात आहे. मनसेमधील धुसफूस, गटबाजी याची माहितीही त्यांना या दौऱ्यातून मिळाल्याने त्यात बदल होतील असे मानले जात आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या घरी जेवले. शासकीय विश्रामगृहात मुक्कामी थांबले. ‘ठाकरें’ मध्ये न दिसणाऱ्या या गुणांचीही आता चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : शिरूर लोकसभा मतदार संघाच्या बैठकीला विद्यमान लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित ठाकरे यांचा दौऱ्यातील वावर प्रश्न समजून घेण्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आपण नेते आहोत, त्यामुळे खूप वेगळे आहोत असे ते वागत नसल्याने वारंवार या, अशी मागणीही विद्यार्थी त्यांच्याकडे करत आहेत. आपले प्रश्न कोणी तरी ऐकून घेत आहे, ही कृतीच दिलासा देणारी असल्याने अमित ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे यांनी कोठेही भाषणबाजी केली नाही. विद्यार्थ्यांशीही त्यांनी मोकळा संवाद साधला. त्यामुळे अमित ठाकरे यांचा हा दौरा बांधणीसाठी उपयोगी ठरू शकतो, असा दावा मनसेचे कार्यकर्ते करत आहेत. मात्र, लातूरसारख्या जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणीही शिक्षणासाठी लागणाऱ्या भरमसाठ पैशांवर काही नियंत्रण आणण्यासाठी विद्यार्थ्यी सेनेने काम करावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.