दीपक महाले

जळगाव : जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, ग्रामीण भाग उन्हाच्या चटक्यांसह रणधुमाळीने तापत आहे. प्रत्येक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असून, पक्षनेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असताना राज्यात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे मतदारांचा कल कुणाकडे आहे, हे उमगत नसल्याने पक्षनेत्यांचीही अडचण झाली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते अजूनही स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहेत. आजी-माजी पालकमंत्री समोरासमोर येत असल्यामुळे जळगाव आणि धरणगाव येथील बाजार समित्यांकडे सर्वाधिक लक्ष लागून आहे.

Blood collection, donation, campaign, lok sabha election 2024, code of conduct
रक्त संकलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
mahayuti and maha vikas aghadi face problem with alliance partner over seat sharing issue
विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 
Ayodhya Paul and uddhav thackeray
अयोध्या पौळ यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे कल्याणच्या उमेदवारीची चर्चा; नंतर खुलासा करत म्हणाल्या…

जिल्ह्यातील जामनेर, रावेर, चाळीसगाव, पारोळा, चोपडा व भुसावळ येथील बाजार समित्यांसाठी २८ एप्रिल, तर जळगावसह बोदवड, पाचोरा, अमळनेर, धरणगाव, यावल या बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे. सर्वाधिक लक्ष जळगाव व धरणगाव येथील बाजार समित्यांकडे असेल. या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकांत आजी-माजी पालकमंत्र्यांचे पॅनल समोरासमोर ठाकतील. भाजपचे नेते गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर या जिल्ह्यातील दिग्गजांकडून बैठका घेतल्या जात असून, ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जात आहेत. प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी असल्याने पक्षाने स्बळावरच निवडणुका लढविण्याबाबत कार्यकर्ते आग्रही आहेत.

हेही वाचा… काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ!

मंत्री महाजन यांनी, बाजार समित्यांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षांत थोड्याफार कुरबुरी, ताणतणाव आहे. मात्र, बाजार समित्यांसह सहकार क्षेत्रातील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही युतीच्या माध्यमातून एकत्र लढण्याचे संकेत दिले. जिल्ह्यातील बाजार समित्यांवर युतीची सत्ता येईल, असा दावा करीत त्यांनी स्वबळाचा नारा देण्यापेक्षा पक्षाची ताकद वाढविण्याबाबत कानपिचक्या कार्यकर्त्यांना दिल्या. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही युतीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याबाबतचे संकेत दिले आहेत. आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे. आमच्या त्यागामुळेच आज भाजप सत्तेत आहे. भाजपनेही मोठेपणा दाखविण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवर ओढाताण न करता भाजपशी जुळवून घ्यावे. युती करूनच बाजार समित्या लढविल्या जातील, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केल्याने या निवडणुका भाजप-शिवसेना शिंदे गट युतीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… लोकसभा निवडणूकीपुर्वी गोवा महामार्गांचे काम मार्गी लावण्याचा भाजपचा प्रयत्न

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापालिकेचे विरोधी गटनेते सुनील महाजन, पंकज महाजन आदींकडून मुलाखती घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडी पॅनलचे १८ उमेदवार रिंगणात असतील, असे देवकर यांनी म्हटले आहे. वाघ यांनी, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुलाखती घेतल्या जात असून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला. भाजप- शिंदे गटाकडून सर्वपक्षीयसाठी प्रस्ताव आल्यास आमचे वरिष्ठ नेते विचार करतील, असे नमूद केल्याने सर्वपक्षीय पॅनलचा पर्याय अजूनही खुला असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा… Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने बळकावला भ्रष्टाचारमुक्तीचा मोदींचा नारा

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जळगावसह धरणगाव येथील बाजार समित्यांची निवडणूक अधिक रंगणार आहे. मंत्री पाटील हे ग्रामीण मतदारसंघातून १९९९ मध्ये पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी पाच वेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले. २००९ च्या निवडणुकीत त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी पराभव केला होता. तसेच २०१४ च्या विधानसभेवेळी देवकर हे घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना तिसर्यांदा विधानसभेत संधी मिळाली. त्यामुळे या बाजार समित्या ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री पाटील आणि माजी पालकमंत्री देवकर यांची कसोटी लागणार आहे.