महेश सरलष्कर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ वर्षांपूर्वी दिलेली ‘भ्रष्टाचारमुक्त सरकार’ची घोषणा आता काँग्रेसने हिसकावून घेतली आहे. कर्नाटकमधील भाजपच्या ४० टक्के कमिशनखोर सरकारची उचलबांगडी करून स्वच्छ प्रशासन देण्याची ग्वाही काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. त्यामुळे बसवराज बोम्मई सरकारमधील भ्रष्टाचार हाच कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल.

Alibag, Alibag assemble seat, shetkari kamgar paksh, Shekap, Jayant Patil, Congress Claims Alibag Assembly Seat Congress, Assembly Seat, Maha vikas Aghadi, Election Defeat, maharasthra asselmbly election 2024, Seat Claim
विधानसभा निवडणुकीतही शेकापची कोंडी करण्याची काँग्रेसची खेळी
Congress, Wardha, Lok Sabha elections,
वर्धा : लोकसभा निवडणुकीवेळी का आले नाही? काँग्रेस नेत्यांचा निरीक्षकास सवाल
Maharashtra legislative council elections
विधान परिषद निवडणुकीत आमची नाही तर काँग्रेसची…
Nagpur congress
विधानसभेची नांदी, नव्या उमेदवाराला संधी… काँग्रेस दक्षिण नागपूरमध्ये…
nagpur cross voting marathi news
विधान परिषद निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचा जो आमदार फुटला…त्याचे नाव…
Rajendra khupsare, uddhav Thackeray
“आम्ही काय फक्त काँग्रेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भांडीच घासायची का?”, उद्धव सेना भडकली
Bhagwat Karad on chandrakant Khaire
“विधानसभेपूर्वी भूंकप होणार, चंद्रकांत खैरेंसह १० जण इच्छुक, मला चार जणांचे फोन आले”, भाजपा नेत्याचा मोठा दावा
Nana Patole
“लपवाछपवीची मॅच नाही, ७० दिवसानंतर खरी…”, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

बडतर्फ खासदार राहुल गांधी ५ एप्रिल रोजी कोलारमधून पक्षाच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोलारमधील प्रचारसभेत राहुल गांधींनी, मोदी सरकार भ्रष्ट उद्योजक व व्यावसायिकांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. सगळ्या चोरांची आडनावे मोदीच कशी असतात, या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी अडचणीत आले आहेत. अब्रुनुकसानीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. पण, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी कोलारची निवड करून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारांच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात ‘राजकीय विधान’ केल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा… Karnataka Assembly Election 2023 : वरुणा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष, बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला मिळणार तिकीट?

भाजपचे आमदार, मंत्री कुठल्याही कंत्राटासाठी ४० टक्के कमिशन घेतात, असा लेखी आरोप कर्नाटकमधील राज्य कंत्राटदार असोसिएशनने केल्यामुळे बोम्मई सरकारची पुरती बदनामी झाली होती. या नामुष्कीतून भाजप अजूनही सावरलेला नाही. मोदी-शहा यांच्यासाठी देखील बोम्मई सरकारची भ्रष्ट प्रतिमा अडचणीची ठरण्याची भीती भाजपचे नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे भाजपने पुन्हा माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर प्रचाराची प्रमुख जबाबदारी सोपवली आहे! २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी काँग्रेसवर ‘१० टक्के कमिशनवाले सरकार’ असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा… Karnataka Assembly Election 2023 : भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? निवडणुकीनंतरच होणार निर्णय?

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्राखालोखाल कर्नाटकमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. राहुल गांधींची बेळ्ळारीतील जाहीरसभाही गाजली होती. त्याच बेळ्ळारी महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदही काँग्रेसने जिंकले असून सर्व सदस्य निवडून आल्याने स्थायी समितीवरही कब्जा केला आहे. त्यावर, हा तर पहिला विजय असल्याचे ट्वीट काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर कन्नडिगांचा आत्मसन्मान परत मिळवण्याची संधी असून ब्रॅण्ड कर्नाटक पुन्हा प्रस्थापित केला जाईल, अशी ग्वाही सुरजेवालांनी दिली. काँग्रेस कर्नाटकाच्या अस्मितेचा मुद्दाही प्रचारातून ऐरणीवर आणण्याची शक्यता सुरजेवालांच्या ट्वीटमुळे निर्माण झाली आहे.

हेही वाचा… Karnataka: मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन योजना; कर्नाटक विधानसभेसाठी ‘आप’कडून आश्वासनांची खैरात

मुस्लिम, दलित आणि आदिवासींना आकर्षित करण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न आहे. बोम्मई सरकारने मुस्लिम समाजाचे ४ टक्के रद्द करून त्यांना आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के कोट्यातून आरक्षणाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात काँग्रेसने रान उठवले आहे. भाजपने लिंगायत व वोक्कलिग या दोन प्रभावी जातींच्या आरक्षणात प्रत्येकी २ टक्क्यांची वाढ केली आहे. ही घटनात्मक तरतूद नसल्याने सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय रद्द होईल. दोन्ही समाजांना खोटे लालूच दाखवले जात असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

हेही वाचा… Karnataka Assembly Election 2023 : भाजप आणि देवेगौडा परस्पर पूरक भूमिका घेणार का ?

कर्नाटकात ५६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून कमाल ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यावरही काँग्रेसने बोट ठेवले आहे. ओबीसींना मागासवर्गीय आयोगाच्या हंगामी अहवालावर आरक्षण देता येत नाही. महाराष्ट्रामध्ये झालेला हा प्रयोग फसला होता. सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद टिकणार नाही, असा मुद्दा सुरजेवालांनी मांडला होता. दलित, आदिवासी, लिंगायत व वोक्कलिग या चारही समाजाच्या आरक्षणामध्ये वाढ करण्यात आली असली तरी, वाढीव आरक्षणाला घटनेच्या ९ व्या अधिसूचीचा आधार नसल्याने भाजपने या समाजाची दिशाभूल केल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला. त्यामुळे भाजपविरोधात ओबीसीच्या मुद्द्यालाही काँग्रेस हात घालण्याची शक्यता दिसते.

हिजाब, हलाल, अजान, टिपू सुलतान अशा अनेक मुद्द्यांवरून भाजपने कर्नाटकमधील वातावरण ढवळून काढले होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हे विषय चर्चेत आणले गेले होते. भाजपकडून कर्नाटकच्या निवडणुकीतही पुन्हा त्याचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काँग्रेस प्रचारात भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाही असेल.

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे कर्नाटक हे मूळ राज्य असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा हे प्रचार करणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.