कोल्हापूर : सहाव्यांदा विधानसभेत पोहोचलेले हसन मुश्रीफ यांच्याकडे सातव्यांदा मंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. काँग्रेस मधून राजकीय प्रवास सुरू केलेल्या मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर अजित पवार यांची पाठराखण केल्यावर मंत्रीपद मिळाले. शिवाय यानंतर त्यांनी महायुतीच्या माध्यमातून राजकारण सुरू केले. परिणामी महाविकास आघाडीत असताना ईडी कडून सुरू झालेले चौकशीचे शुक्लकाष्ठही थांबले.

१९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत पोहोचल्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन , दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. २००४ पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, औकाफ खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. २००४ मध्ये विधानसभेवर निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे आधीच्या खात्याशिवाय विधी व न्याय राज्यमंत्री म्हणून कामाची जबाबदारी आली. २००८ पासून त्यांनी नगर विकास, जमीन कमालधारणा, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्यांक विकास, विधी व न्याय या खात्यांचा कार्यभार सांभाळला.

आणखी वाचा-मंत्र्यांची ओळख : ॲड. माणिक शिंदे, संजय सावकारे, जयकुमार रावल, नरहरी झिरवळ

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले तेव्हा त्यांच्याकडे नगर विकास, कमाल जमीनधारणा, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्यांक विकास विधी व न्याय या खात्याचा राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली. पुढे ते कामगार व जलसंपदा खात्याचे मंत्री झाले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले तर तेव्हा राज्यात युतीचे सरकार आल्याने मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ साली विधानसभेत विजयी झाल्यावर महाविकास आघाडी शासनात ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. तर महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा समरजित घाटगे यांचा दुसऱ्यांदा आमदार बनले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गेली सात वर्ष अध्यक्ष असलेल्या मुश्रीफ यांच्याकडे आणखी एकदा मंत्रीपदाची जबाबदारी आली आहे.