कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या नौबती झडत असल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध आतापासूनच लागले आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या रणातच विधानसभेची पेरणी केली जात आहे. विशेषतः भाजपला तिसऱ्यांदा केंद्राच्या सत्तेत आणण्याचा इरादा एकमुखाने व्यक्त करणारे महायुतीतील नेतेच विधानसभा निवडणुकीत एकमेका विरोधात दंड थोपटताना दिसत आहेत आहे. महाविकास आघाडीचे राजकारणही याहून अधिक वेगळे असणार नाही. यामुळे लोकसभेला दिसणारी राजकीय पक्षांची एकी विधानसभेवेळी बेकी होणार याची झलक दिसू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे संकेत मिळालेल्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही मित्रपक्षांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या आणाभाका एकाच मंचावर घ्यायला सुरुवात केली आहे. लोकसभेसाठी जी एकवाक्यता दिसते ती विधानसभा निवडणुकीवेळी मुळीच राहण्याची शक्यता नाही. किंबहुना हेच नेते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणार हेही आताच दिसू लागले आहे. यामुळे विधानसभेवेळी सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये स्वतंत्र लढती किंवा बंडखोरीचे पेव फुटणार हेही एकंदरीत रागरंग पाहता दिसत आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील मतदारसंघांमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये विधानसभेसाठी अंतर्गत संघर्षाने टोक गाठले आहे.

Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Harshwardhan jadhav
“मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव आमदार”, हर्षवर्धन जाधव लढवणार लोकसभा निवडणूक; पण कोणत्या पक्षातून?

हेही वाचा : सदाभाऊ खोत यांचे शिंदे गटाला आव्हान, हातकणंगलेवर दावा

महायुतीतील सामना

कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या पालकमंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत. पाच वेळा हा आखाडा मारलेले मुश्रीफ हे विद्यमान आमदार म्हणून पुन्हा रिंगणात असणार हेउघड आहे. त्यांच्या विरोधात गत वेळी लढत दिलेली भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनीही जोरदार तयारी केली आहे. पक्ष, चिन्ह कोणतेही असले तरी या दोघांसह ठाकरे सेनेचे माजी आमदार संजयसिंह घाटगे हेही रिंगणात असणार आहेत.

हेही वाचा : रवी राणा, बच्‍चू कडूंमधील वाद पुन्‍हा चव्‍हाट्यावर

‘गडा’वर अंतर्गत सामना

चंदगड मतदारसंघात अजितदादा गटाचे राजेश पाटील आमदार आहेत. येथेही कागल प्रमाणे भाजपचे शिवाजी पाटील यांनी चांगलीच बांधाबांध चालवली आहे. अलीकडेच अजितदादा चंदगड मध्ये शिवाजी महाराज पुतळा अनावरणाला आले, पण परवानगीच्या तांत्रिक अडचणीमुळे खोळंबा झाला. पण शिवाजी पाटील यांनी पुतळा अनावरण करून एकप्रकारे अजितदादा, राजेश पाटील यांना शह दिल्याची चर्चा आहे. या दोन्ही पाटीलांमध्ये विधानसभेचा संघर्ष आतापासूनच तापला आहे. शिवाय, येथे शरद पवार राष्ट्रवादीकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर याही रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू आहेत. भुदरगड – राधानगरी मध्ये सध्या महायुतीकडून शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, अजितदादा गटाचे माजी आमदार के. पी. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई असे प्रमुख नेते लोकसभेसाठी एकत्र दिसत आहेत. विधानसभेला हेच तिघे एकमेकांच्या विरोधात उभे टाकतील. पन्हाळा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे हे आमदार आहेत. त्यांची पारंपरिक लढत ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याशी होणार हे स्पष्ट आहे.अलीकडेच अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. कोरे – आसुर्लेकर यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. असुर्लेकर पाटील यांनाही विधानसभेचे वेध लागले असल्याने तेही निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. इचलकरंजीत जिल्हा काँग्रेसचा राजीनामा देऊन प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून निवडून आल्यावर भाजपसोबत राहिले. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर अशी महायुती अंतर्गत लढत होण्याची शक्यता असून मविआचा उमेदवार कोण यावर गणित ठरणार आहे.

हेही वाचा : पक्षाला जनतेत पोहोचवण्यासाठी नितीश कुमारांची धडपड; एनडीएप्रवेशानंतरही बिहारसाठी ‘विशेष दर्जा’ची मागणी

महाविकास आघाडीत गोंधळ

महाविकास आघाडीतील परिस्थिती याहून वेगळी अशी नाही. हातकणंगले राखीव मतदारसंघात काँग्रेसचे राजू जयवंतराव आवळे आमदार आहेत. ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांचीही जोरदार तयारी असल्याने माविआ अंतर्गत संघर्षात जनस्वराज्य पक्षाकडून गतवेळी लढत दिलेले अशोक माने हे उतरणार असल्याने येथील लढत अधिकच चुरशीची होणार आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून आल्यावर मातोश्री वरून मंत्री झाले. सध्या ते शिंदे सेनेबरोबर आहेत. त्यांच्या विरोधात मविआ कडून काँग्रेसचे दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, ठाकरे सेनेचे माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक असे अनेक जण इच्छुक असल्याने येथेही अंतर्गत सामना अटळ आहे.