नाशिक : केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरणाविषयीचे धरसोड धोरण, कांद्याचे घसरणारे दर, अनेकवेळा आंदोलन करुनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कांदा उत्पादक लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारविरोधात एकवटू लागल्याचे चित्र आहे. भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाविषयी जनजागृतीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषत: कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव (कसमादे) या भागात शेतकऱ्यांनीच तयार केलेला कांदा रथ फिरत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

कांदा उत्पादकांना काहीसा फायदा होऊ लागताच भाजप सरकारकडून निर्यातबंदी केली जात असल्याचा अनुभव वारंवार येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांचा रोष परवडणारा नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने निर्यातबंदी उठवली असली तरी ती पूर्णत: खुली केलेली नाही. त्यातही अनेक अटी-शर्ती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम आहे. काही दिवसांपूर्वी चांदवड येथे कांदा उत्पादकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनीही सहभाग घेतला होता. पुढील आठवड्यात शरद पवार हे पुन्हा जिल्ह्यात येत असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

हेही वाचा : पुण्यात काँग्रेसमध्ये चौघे इच्छूक, उमेदवारी कोणाला ?

भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर कशा प्रकारे अन्याय केला जात आहे, हे पटवून देण्यासाठी व्यंगचित्रकार किरण मोरे आणि बागलाण तालुका शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून कांदा रथ तयार झाला. कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही यात्रा गेली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात संकल्प रथयात्रा सुरु केली होती. या रथयात्रेला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विरोध झाला होता. आता सरकारला त्यांच्याच पद्धतीने कांदा रथयात्रेव्दारे उत्तर दिले जात आहे.

शेतकरी सायंकाळी शेतातील कामे आटोपून गावात परतत असल्याने प्रामुख्याने सायंकाळीच रथयात्रा गावात जाते. गावातील प्रमुख ठिकाणी ध्वनिक्षेपकावरुन प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ऐकवली जातात. त्यानंतर कांदा उत्पादकांवर कसा अन्याय होत आहे, ते मांडले जाते. गावातील शेतकऱ्यांनाही त्यांचे मत मांडण्यास सांगितले जाते.

हेही वाचा : Loksabha Poll 2024 : हिंदी भाषक प्रदेशात AIMIM ची ‘एंट्री’; ‘इंडिया’ आघाडीसमोर आणखी एक आव्हान!

बागलाण तालुक्यातील ठेंगोडा गावातील सिद्धीविनायक मंदिरापासून या कांदा रथयात्रेला सुरुवात झाली आतापर्यंत हा रथ ठेंगोडा, मोरेनगर, दऱ्हाणे, मुंजवाड, शेमळी, आराई, ब्राह्मणगाव, नामपूर, सोमपूर, जायखेडा, करंजाड, ढोलबरे, पारनेर, निताने, द्याने आदी बागलाण तालुक्यातील गावांमध्ये फिरला. त्यानंतर देवळा आणि कळवण तालुक्यांमध्ये फिरला. रथ उमराणे बाजार समिती आवार आणि चांदवड तालुक्यातही जाणार आहे.

कांदा रथयात्रेव्दारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत रथयात्रा फिरणार आहे. रथाला इंधनासाठी लागणारे पैसेही शेतकरीच देत आहेत.

केशव सूर्यवंशी ( अध्यक्ष, बागलाण तालुका शेतकरी संघटना)