बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष सक्रिय झाले असून, ते मोठ्या प्रमाणात एआयचा वापर करत असल्याचे दिसून येते. कोविडनंतर सुरू झालेला डिजिटल प्रवास आताही कायम असून, त्यात एआयची भर पडलेली आहे. एआय जनरेटेड एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोसळलेल्या पुलाच्या पार्श्वभूमीवर वादळामध्ये पावसात नाचताना दिसत आहेत. त्यांच्या गलथान कारभाराची खिल्ली उडविणारा हा व्हिडीओ ‘जुमलों की बारीश’ व्हायरल झाला होता. लालूंनी आतापासून रणनीती आखत एनडीए सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ते काही जुन्या कंटेंटचाही वापर करीत आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव एका वृद्ध महिलेला जड टोपली उचलण्यास मदत करतानादेखील दिसत आहेत. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पोस्ट केलेल्या क्लिपला मुसळधार पाऊस आणि खोट्या आश्वासनांची गारपीट, अशी कॅप्शनही दिली आहे. राजदचा हा व्हिडीओ बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या परिवर्तनावर पुन्हा एकदा प्रकाश टाकत आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या ग्रामीण वक्तृत्व, विनोद आणि जातीय प्रतीकात्मकतेद्वारे परिभाषित केलेल्या राजदच्या पारंपरिक निवडणूक प्रचारापेक्षा एआयच्या मदतीद्वारे वापरण्यात येणारी ही पद्धत खूप वेगळी आहे. लालूंना अल्गोरिदमची आवश्यकता नव्हती. त्यांचा जनसंपर्क, विनोदी वृत्ती याआधीही अनेकदा समोर आली आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राजदने आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक नवीन डिजिटल मोहीम आखल्याचे दिसत आहे. त्यामध्ये डेटा, मिम्स आणि अल्गोरिदम यांची सांगड घालत प्रचाराच्या वेळी राजद विरोधी पक्षाला मजबूत टक्कर देईल.

बिहार हित में मौसम की चेतावनी- आज बिहार ध्ये झूठ, जुमलों और भ्रम की भारी बरसात हो रही है, गरज के साथ झूठे लुभावने वादों के ओले भी पड़ रहे हैं, संभल कर की- रहे। #बिहार #तेजस्वी यादव #RJD pic.twitter.com/VrGTcjRN98

— लालू प्रसाद यादव (@laluprasadrjd) 20 जून 2025

एआय ग्राफिक्समध्ये नितीश एका मॉक परीक्षा कक्षात तेजस्वीच्या पेपर्समधून कॉपी करताना दाखवले आहेत. फोटो: इंडियन एक्सप्रेस

जग बदललं आणि मतदारही बदलला. त्यामुळे आता प्रचाराचा सूरही बदलला आहे. बिहार हे भारतातील सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी एक आहे. इथे स्मार्टफोनचा वापरही मोठ्या प्रमाणात आहे. “आता प्रत्येक घरात अँड्रॉइड फोन आहेत. प्रत्येक तरुण, पुरुष असो वा महिला विविध प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पाहतच असतात. त्यामुळे एआय व्हिडीओंच्या माध्यमातून आम्ही आमची विचारसरणी, आश्वासने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत”, असे राजदचे प्रवक्ते सुबोध कुमार यांनी म्हटले आहे.

एआय प्रचार

तेजस्वी यांचा प्रचार एका पिढीगत बदलाची भूमिका ठळक करतो. हा बदल पक्षाच्या संदेशातून दिसून येतो. “बिहारमध्ये २० वर्षे जुने वाहन चालवण्यास परवानगी नाही. मग २० वर्षे जुने नितीश कुमार सरकार कशाला?” अशा स्वरूपाची जोरदार टीका तेजस्वी यांनी एका पोस्टमध्ये नऊ वेळा मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्यावर केली आहे.

आरजेडीच्या सोशल मीडिया टीमने वेळ न दवडता, या घोषणेचे रूपांतर व्हिडीओमध्ये केले. एआय रेंडर केलेल्या कार्टूनमध्ये एक जुने फवारणी करणारे वाहन तेजस्वी यांच्या नेतृत्वाचे प्रतीक असलेल्या नवीन वाहनाला मागे टाकत असल्याचे दाखवले होते. एका व्हिडीओमध्ये दोन महिला महागाईबद्दल बोलत असल्याचे दाखवले आहे. तसेच तेजस्वी रोख रक्कम आणि ५०० रुपयांच्या सिलिंडरच्या माध्यमातून त्यांचे आयुष्य सोपे करण्याचे आश्वासन घेऊन आत येत आहेत. दुसऱ्या एआय ग्राफिक्समध्ये नितीश एका मॉक परीक्षा कक्षात तेजस्वीच्या पेपर्समधून कॉपी करताना दाखवले आहेत. त्यामध्ये सरकारने नंतर जाहीर केलेल्या वृद्धापकाळातील पेन्शन वाढविण्याच्या राजद नेत्याच्या प्रतिज्ञेचा संदर्भ होता. अलीकडेच एका एआय व्हिडीओमध्ये तेजस्वी आंबेडकरांसोबत चालताना दिसत आहेत. सामाजिक न्याय आणि नवीन शासन यांच्यातील प्रतीकात्मक दुवा मांडताना दलित मतदारांना एक स्पष्ट आवाहन, असे या व्हिडीओमार्फत सांगण्यात आले आहे. डिजिटल व्हिज्युअल स्वरूपात पक्षाच्या संदेशाचे असे पॅकेजिंग तेजस्वीच्या मोहिमेचे एक ठळक वैशिष्ट्य ठरले आहे.

आरजेडीच्या सोशल हँडलवर पक्ष स्थानिक भाषा बोलताना दिसत आहे. प्रतिस्पर्ध्यांवर एआय जनरेटेड स्पूफ्स, नितीश कुमारांच्या यू-टर्नला लक्ष्य करणारे रॅप लेस्ड अ‍ॅनिमेशन याचा वापर पक्षाने केल्याचे दिसून येते. पक्षाच्या एक्स हँडलवर एकदा हिंदीमध्ये घोषणा करणारी एक आकर्षक ग्राफिक पोस्ट करण्यात आली होती. ‘सबसे न्यारा, सबका प्यारा, तेजस्वी हमारा’, हे वाक्य आरजेडीच्या मुख्यमंत्र्‍यांच्या चेहऱ्याच्या एआय प्रतिमेवर लावण्यात आली होती. आणखी एक म्हणजे आरजेडीची टीम एआयचा वापर लालूंच्या जुन्या विनोदांचे पुन्हा व्हिडीओ बनविण्यासाठी करीत आहे. मशीन लर्निंग टूल्सद्वारे लालूंच्या प्रसिद्ध विनोदांच्या संग्रहित फुटेजचा वापर करून, त्यांचे ऑडिओ आणि व्हिडीओ गुण वाढवत आहेत. नंतर लोकांना लालूंच्या जादूची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याकडून ऑडिओ आणि व्हिडीओ प्रसारित करण्यात येत आहेत. त्यामुळे वृद्ध मतदारांच्या ते आठवणीत राहतील आणि तरुणांचे मनोरंजन होईल, असा विश्वास पक्षाला आहे.

राजदची डिजिटल मोहीम ही पक्षाच्या संदेशाबद्दल आहे. “आमची मोहीम पक्षाची विचारसरणी आणि संघटनात्मक ताकदीवर बांधली गेली आहे. जनसंपर्कासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा तिसरा आधारस्तंभ आहे”, असेही सुबोध कुमार म्हणाले.

राजदच्या मोहिमेने यापूर्वीही भाजपा-जेडीयूच्या अविरत हल्ल्यांना तोंड देण्याचा प्रयत्न केला होता. “नितीश यांच्या काळात गुन्हेगारीचा आलेख कसा उंचावला आहे हे आम्ही डेटाद्वारे दाखवून दिले आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात बिहारच्या दरडोई जीडीपी आणि राष्ट्रीय जीडीपीमधील दरी आणखी वाढली आहे हेदेखील आम्ही दाखवून दिले आहे”, असे सुबोध कुमार यांनी म्हटले.
राजदने तेजस्वी डिजिटल फोर्सदेखील सुरू केले आहे. हे मोहिमेतील सामग्री वितरित करण्यासाठी आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी काही तंत्रज्ञान एक्स्पर्ट स्वयंसेवकांचे नेटवर्क आहे. “पक्षात एक संशोधन पथक आहे, जे डेटाच्या आधारे आम्हाला मिळालेल्या प्रतिसादांवर काम करीत आहे, असेही ते म्हणाले. या डिजिटल पथकात पक्षांतर्गत युवा सदस्य आणि काही बाहेरच्या सल्लागारांचा समावेश आहे”, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल वॉर

राजदच्या जुमलों की बारीश या व्हिडीओच्या काही दिवसांनंतर भाजपाच्या एक्स हँडलवरून ‘गँग्स ऑफ घोटालाबाज’, असा एक एआय जनरेटेड व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये लालूंच्या कुटुंबाला घोटाळ्यांचे किंग, असे म्हटले गेले आहे. राजदच्या केवळ टीकात्मक व्हिडीओंपेक्षा भाजपाने केलेल्या पोस्ट अत्यंत संयमी होत्या. एनडीए सरकारने त्यांच्या कामगिरीवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

जेडीयूने सुरुवातीच्या काळात डिजिटल पद्धतीचा अवलंब केला होता. २०२० ला कोविड प्रभावित बिहार निवडणुकीत जेव्हा प्रचार रॅलींवर मर्यादा होत्या, त्यावेळी पक्षाने नावीन्यपूर्ण अशा व्हर्च्युअल रॅली आणि व्हॉट्सअ‍ॅप मोहिमा राबविल्या. नितीश यांच्या टीमने ‘नया बिहार, नई सोच’ नावाच्या मोहिमेत ३०० हून अधिक स्थानिकांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जेडीयूच्या सोशल मीडिया कंटेंटचे मोजमाप केले जात असल्याचे दिसून येत आहे. पक्ष गेल्या पाच वर्षांत बांधलेल्या पूल किंवा शाळांवर व्हिडीओ पोस्ट करीत आहे. तसेच विविध योजनांच्या लाभार्थींचा लेखाजोखा सादर करीत आहे. राजदचा महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मोठ्या प्रमाणात तेजस्वी यांच्या मताशी आपला ऑनलाइन प्रचार जुळवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर लहान मित्रपक्षदेखील सोशल मीडिया वापरताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहारमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राजदने थेट घोषणाबाजी आणि डिजिटल स्टोरी टेलिंगचा वापर करून, जनसंपर्कात एक पिढीजात आणि धोरणात्मक बदल घडवून आणला आहे. पक्ष आता पारंपरिक पद्धतीने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी एआय व्हिडीओ, मिम्सवर अवलंबून आहे.