मुंबई : काँग्रेस व प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाहीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाके मुरडत असले तरी भाजपच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचे प्रतिबिंब उमटले आहे. नेतेमंडळींची मुले, पत्नी भाऊ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

घराणेशाहीला भाजपमध्ये थारा नाही, असे मोदी यांच्यापासून सारे नेते दावा करीत असतात. पण भाजपमध्येही घराणेशाहीला प्राधान्य मिळत असल्याचे बघायला मिळते. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे एका मुलगा खासदार तर दुसरा आमदार आणि प्रदेशाध्यपदी असताना विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरिता दुसरे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मुलाला शनिवारीच पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली असतानाच त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मुंबईतून १३ विद्यामान आमदारांना पुन्हा संधी; शिवसेनेने दावा केलेल्या मतदारसंघांत भाजपचे उमेदवार

घराणेशाहीचे प्रतिबिंब

● माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार अरुण अडसड आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर या तीन नेत्यांच्या विद्यामान आमदार असलेल्या मुलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

● काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी दिल्यावर त्यांची कन्या श्रीजया यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी.

● माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांची पत्नी प्रतीभा पाचपुते यांना श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी.

● विद्यामान आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार प्रकरणी अटकेत असल्याने कल्याण पूर्व मतदारसंघातून पक्षाने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली.

● इचलकरंजी मतदारंसघातून विद्यामान आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

● कोकणात नारायण राणे खासदार तर नितेश राणे यांना पुन्हा कणकवली मतदारसंघातून आमदारकीसाठी संधी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● चिंचवडमध्ये माजी आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या भावाला यंदा उमेदवारी दिली.