छत्रपती संभाजीनगर : ‘हिंदूविरोधी आणि राक्षस’ असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर कालीचरण महाराजांनी टीका केली. यानंतर मराठा समाजाच्या मतदानामध्ये कमालीची घट होईल, असे लक्षात आल्याने औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे) उमेदवार संजय शिरसाट यांनी मंगळवारी जरांगे यांची भेट घेतली. कालीचरण महाराजांची सभा आयोजित करण्यात आपला कोणताही हात नव्हता, असा दावाही शिरसाट यांनी केला.

दरम्यान, ‘हर हर महादेव’ संघटनेच्या वतीने संजय बारवाल यांनी केलेला अर्ज आणि त्यांच्याबरोबर संजय शिरसाट यांचे छायाचित्र समाज माध्यमांमध्ये झळकवत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बारवाल हे शिरसाट यांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक : संयुक्त संसदीय समितीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता कमीच, कारण काय?

जबिंदा येथील मैदानावर कालीचरण महाराजांची सभा झाली. या सभेत बोलताना हिंदू जातीवादाचे शेण खातात. एक आंदोलन सुरू झाले होते, हिंदू-हिंदूमध्ये फूट पाडण्याचे. लाखो लोक या आंदोलनात सहभागी होते. ते हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. गोरगरीब मराठ्यांच्या मुलाच्या हिताची लढाई कालिचरण महाराज यांना कळणार नाही. तो एक विचित्र प्राणी असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली.

हेही वाचा : स्वतःचं घर, गाडी नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला राज्यात जिवंत ठेवणारे एकमेव आमदार आहेत तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा समाज हुशार, संभ्रम नाही!

जालना : राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचे असल्याने एकदा दिलेला संकेत समाजास कळतो. समाज हुशार असल्याने संभ्रमात नाही. आपण मराठा समाजास कोणत्याही पक्षाच्या दावणीस बांधलेले नाही. त्यामुळे कुणाला पाडायचे आणि कुणाला निवडून आणायचे ते समाज ठरवेल, असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी आंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलतानासांगितले. विधानसभा निवडणुकीत आपला कुणीही उमेदवार नाही. विधानसभा निवडणुकीतही कुणाला पाडायचे आणि कुणाला निवडून आणायचे ते समाजाने ठरवावे, असेही ते म्हणाले.