दयानंद लिपारे

कोल्हापूर : सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्वाचा कस लागला आहे. याचवेळी या दोन्ही जिल्ह्यातील तरुण पिढीचाही सहकाराच्या आखाड्यात सामना रंगला आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे यांचे पुत्र विश्वजित महाडिक यांनी सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. तर, भीमा कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे व अजिंक्यराणा आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांनी मोहीम उघडली आहे.

sanjay raut slams raj thackeray
Raj Thackeray : नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर खोचक टीका
Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर 

कोल्हापूर जिल्ह्यातील दिवंगत भीमराव महाडिक यांनी मोहोळ तालुक्यात सिकंदर टाकळी येथे भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना ४० वर्षांपूर्वी केली होती. त्यांच्याकडे दहा वर्षे सत्ता राहिल्यानंतर पुन्हा ती सुधाकर परिचारक, राजन पाटील यांच्याकडे गेली होती. सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सोबतीने चार हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत वडिलांचा कारखाना आपल्याकडे घेण्यात यश मिळवले. आता १३ नोव्हेबर रोजी ६४ गावांतील १९ हजार सभासद असलेल्या कारखान्याची निवडणूक होत असताना त्यासाठी सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. या वेळी खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी साथ दिली असताना या गटाला राजन पाटील, प्रशांत परिचारक या माजी आमदारांनी आव्हान दिले आहे.

हेही वाचा… देवराव भोंगळे : अभ्यासू व्यक्तिमत्त्व

अमेरिकेतील पदवीधर सहकारी आखाड्यात

वरिष्ठ नेत्यांमध्ये हा सामना रंगला असताना उभय आघाडीतील नवी पिढीही या आखाड्यामध्ये जोमाने ताकतीने उतरलेली आहे. युवा नेते या निवडणुकीत आपली भूमिका प्रखरपणे मांडताना दिसत आहेत. धनंजय महाडिक यांच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने पुत्र विश्वराज महाडिक यांच्याकडे आली आहे. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाचे पदवीधर असलेले विश्वराज यांनी या भीमा कारखान्याचे नेतृत्व सांभाळण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते अधिक सक्रिय झाले असून प्रचारात संपर्क यात्रा निमित्ताने प्रचारात उतरले आहेत. आजोबांनी स्थापन केलेल्या या पवित्र भूमीतील भीमा कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते प्रचारात सांगत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २२०० रुपयांची पहिली उचल आणि २६०० रुपये एफआरपी देणारा हा एकमेव कारखाना काटेमारी मुक्त असल्याचा दावा करताना विश्वराज महाडिक यांनी सहवीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती या विस्तारीकरण करणार असल्याचे आवर्जून सांगत आहेत.

हेही वाचा… तो राजाच हो, त्याला बघायला आम्ही आलो…;राहुल गांधींना पाहण्यासाठी सामान्य जनतेत कुतुहल

माजी आमदारांची तरुण पिढी सक्रिय

दुसऱ्या बाजूला विरोधी आघाडीतूनही माजी आमदारांची तरुण फळी प्रचारात हिरीरिने उतरली असल्याचे दिसत आहे. भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असलेले राजन पाटील यांचे पुत्र बाबूराव पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळराजे पाटील व सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांच्या समवेत प्रचाराला हात घातला आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळी प्रणव परिचारक यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. या युवा त्रिमूर्तींनी भीमा कारखान्यातील गैरव्यवहारावर बोट ठेवले आहे. विद्यमान अध्यक्षांनी कारखाना कर्जबाजारी केल्याचा आरोप करीत कारखान्याला वैभव प्राप्त करून देण्यासाठी तो भीमा बचाव परिवर्तन आघाडीकडे देण्याची गरज त्रयींनी व्यक्त केली आहे. कारखान्याचे वाटोळे करणाऱ्यांना मत मागायचा अधिकार आहे का, असा प्रश्न ते सभेत उपस्थित करीत आहेत. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच सत्ताधारी गटातील विश्वराज महाडिक आणि विरोधी गोटातून बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, प्रणव परिचारक हे कारखान्याची सत्तासूत्रे आपल्याकडेच सोपवण्याची गरज प्रचारात व्यक्त करत आहेत. या तरुण नेतृत्वांचा साखर कारखानदाराच्या राजकारणातील प्रवेश सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरला आहे.