सुजित तांबडे

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आता कसब्यात ब्राह्मण नेतृत्व राहिले नसल्याचे वक्तव्य केले असताना काँग्रेसनेही रोहित टिळक यांच्याऐवजी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कसब्यात ब्राह्मणेतर उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे. या मतदार संघात प्रथमच उघडपणे ब्राह्मण-ब्राह्मणेतर उमेदवारांची चर्चा घडली सुरू असताना ब्राह्मण समाजाचे मतदार किती? तर अवघे १३ टक्के …प्रत्यक्षात या मतदारसंघातील जातनिहाय आकडेवारी पाहता सर्वाधिक मतदार हे इतर मागासवर्गीय असून, त्या खालोखाल मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या आहे. हेच मतदार भाजपचे पारंपरिक पाठिराखे असून, या निवडणुकीत या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
health of two election officials deteriorated due to heat wave In Nagpur
नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी
lok sabha elections 2024 dcm devendra fadnavis announced name of shrikant shinde from kalyan
श्रीकांत शिंदेंचे ‘कल्याण’; फडणवीसांची ठाण्यात ‘पाचर’, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा

हेही वाचा >>>चंद्रशेखर राव यांचा राज्यात ‘किसान सरकार’चा नारा

कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. शैलेश टिळक यांना डावलण्यात आल्याने या मतदारसंघात पहिल्यांदाच उघडपणे उमेदवारांची जात ही चर्चेत आली आहे. शैलेश टिळक यांच्याऐवजी भाजपने पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने कोथरुडनंतर कसब्यातून भाजपने ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याची चर्चा समाजमाध्यमांवरही सुरू झाली आहे. काँग्रेसनेही रोहित टिळक; तसेच प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याऐवजी माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामार्तब केले आहे. त्यामुळे या मतदार संघात दोन्ही उमेदवार हे ब्राह्मणेतर असणार आहेत.

हेही वाचा >>>Tripura Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविणार

वास्तविक कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे मतदार अवघे १३.२५ टक्के म्हणजे ३६ हजार ४९४ असून हे मतदार निर्णायक नसल्याचे आजवर झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील पोलिटिकल रिसर्च ॲण्ड ॲनॅलिसिस ब्युरो (प्राब) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या मतदारसंघात सर्वाधिक मते ही इतर मागासवर्गाची ३१.४५ टक्के म्हणजे ८६ हजार ६२२, तर मराठा व कुणबी २३.८५ टक्के म्हणजे ६५ हजार ६९० आहेत.

या मतदारसंघामध्ये इतर मागासवर्ग, मराठा आणि कुणबी ही मते भाजपची पारपंरिक मते आहेत. भाजपने कोणताही उमेदवार दिला, तरी त्यांच्या पाठीशी हा मतदार कायम राहिला आहे. भाजपच्या उमेदवारांना या मतदारांबरोबरच ब्राह्मण समाजाची साथ मिळाल्याने भाजपला काही अपवाद वगळता कायम या मतदारसंघात विजय मिळाला आहे.

अनुसूचित जाती- जमातीची मते अधिक
ब्राह्मण समाजापेक्षाही अनुसूचित जाती-जमातीची मते ही अधिक आहेत. सध्या या मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातीची ३८ हजार ११९ मते आहेत. याबाबत ‘प्राब’चे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ म्हणाले, ‘या समाजांच्या मतांची कायम विभागणी होत असते. बहुतांश मते ही काँग्रेसकडे,तर उर्वरित मतदार हे भाजपच्या पाठीशी असतात, असे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे’

हेही वाचा >>>आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धरमैया यांचा मोठा निर्णय; म्हणाले, “ही निवडणूक…”

अल्पसंख्याक मतांची विभागणी
या मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत. मुस्लिम मतदार हे २८ हजार ९२०, तर जैन, ख्रिश्चन आदी समाजाची सुमारे १९ हजार ५८३ मते आहेत. या मतदारांची कायम विभागणी होत असते. काँग्रेसबरोबरच भाजपलाही मुस्लिम मतदार साथ देत आला आहे. जैन, ख्रिश्चन ही मते भाजप आणि काँग्रेसला मिळत असतात, असे भुजबळ यांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

प्रवर्ग टक्के मतदार संख्या
ब्राह्मण १३.२५ ३६,४९४
मराठा व कुणबी २३.८५ ६५,६९०
इतर मागासवर्ग ३१.४५ ८६,६२२
अनुसूचित जाती ९.६७ २६,६३४
अनुसूचित जमाती ४.१७ ११,४८५
मुस्लिम १०.५० २८,९२०
जैन, ख्रिश्चन ७.११ १९,५८३
एकूण मतदार संख्या २,७५, ४२८

स्रोत : पोलिटिकल रिसर्च ॲण्ड ॲनॅलिसीस ब्युरो (प्राब), पुणे