कॉंग्रेस अध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांची निवडणूक ही मतदान प्रक्रियेवरून २००० दरम्यान चर्चेत आली होती. मतदार यादी सार्वजनिक करून प्रक्रियेच्या पारदर्शकतेची खातरजमा करावी अशी मागणी किमान तीन पक्ष नेत्यांनी सध्या केली आहे.

गेल्यावेळी २००० मध्ये प्रसाद यांच्या गटाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडे उमेदवारांची नामांकने दाखल होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर निवडणूक सूचीमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यावेळी लावण्यात आला होता. मतदार सूचीतील नावं बोगस असल्याचे प्रसाद यांच्या समर्थकांनी म्हटले होते. सध्या पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर असताना पुन्हा एकदा अशाच स्वरूपाच्या आरोपांची पुनरावृत्ती होते आहे.

आधी जी-२३ सदस्य आनंद शर्मा यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत अधिक माहिती देताना कॉंग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधूसुदन मिस्त्री म्हणाले, “मतदान सूची प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडे असते. ज्यांना ती पाहायची असेल त्यांनी कमिटीला संपर्क करावा. नामांकन हवे असल्यास कमिटीशी संपर्क करावा, आम्ही त्यांना ते देऊ. ते सर्वसाधारण जनतेकरिता नाही. ही संघटनात्मक निवडणूक आहे. ती पक्षाची मालमत्ता आहे,” असेही मिस्त्री यांनी सांगितले.

या निवडणुकीवर बोट ठेवत तिवारी म्हणाले, “ही निवडणूक २८ प्रदेश कॉंग्रेस कमिट्यांसाठी होत नाही. तर मग एखाद्याने देशातील प्रत्येक प्रदश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात खेटे का घालावेत? ही निवडणूक पारदर्शक असावी म्हणून संपूर्ण मतदार सूची पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “जर एखाद्याने नामांकन मिळवण्यासाठी अर्ज केला तर त्याच्या नावाला १० कॉंग्रेसींनी मंजुरी द्यावी. कारण कॉंग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरण एखादा उमेदवार वैध नसल्याचे सांगत त्याचा अर्ज रद्द करू शकते.” तिवारी याना लोकसभेचे खासदार क्रती चिदंबरम यांचाही दुजोरा मिळाला, “प्रत्येक निवडणूक ही सुस्पष्ट आणि व्याख्याबद्ध असावी. सुधारणांची अपेक्षा करणारे बंडखोर नसतात.”  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याशिवाय जी-२३ सदस्य शशी थरूर यांनीही मनीष तिवारींच्या मताला दुजोरा देत सांगितले, “नक्कीच हे महत्त्वाचे आहे. निवडणूक सूचीत पारदर्शकता असली पाहिजेच. निवडणुकीला कोण उभे राहिले आणि मत देण्याचा अधिकार कोणाला आहे हे सर्वांना ठाऊक असले पाहिजे. मनीष यांचे म्हणणे योग्यच आहे.”