राजस्थानमधील राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांच्यावर अपहरणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुढा काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या गटातील नेते मानले जातात. याच कारणामुळे गुढा यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून येथे राजकारण रंगले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र सिंह गुढा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शुभांगी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर भातखळकरांची टीका; सचिन सावंतांचेही जशास तसे उत्तर, म्हणाले “कंगना…”

राजेंद्र गुढा अशोक गेहलोत सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सैनिक कल्याण, होमगार्ड तसेच पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाचे राज्यमंत्रीपद आहे. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते बहुजन समाज पार्टीच्या तिकीटावर निवडून आले होते. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आता सचिन पायलट यांच्या गटातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. याच कारणामुळे त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा >>> तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची उद्या राज्यात पहिली सभा, जोरदार वातावरणनिर्मिती

राजेंद्र गुढा यांच्यावर आरोप काय?

दुर्गा सिंह नावाच्या ४३ वर्षीय व्यक्तीने राजेंद्र गुढा यांच्यावर अपहराणाचा आरोप केला आहे. दुर्गा सिंह हे मूळचे झुंझूनू जिल्ह्यातील उदयपूरवती तालुक्यातील काकराना येथील रहिवासी आहेत. त्यांनी राजेंद्र गुढा यांनी मला फोन कॉल करून धमकावल्याच तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. २७ जानेवारी रोजी गुढा यांनी मला फोन कॉल केला. तसेच तू कोठे आहेस अशी विचारणा केली. मी त्यांना घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर ते माझ्या घरी आले. त्यांच्यासोबत ८ ते १० लोक होते. त्यांनी मला धमकावले,” असा आरोप दुर्गा सिंह यांनी केला आहे.

हेही वाचा >>> Karnataka : शेवटच्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांची शक्यता, मात्र निधी उभारण्याचे बोम्मई सरकारपुढे आव्हान!

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र गुढा यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यांनी अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. “तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ नका, असे मला माझ्या बायकोने सांगितले होते. जर एखाद्या मंत्र्याविरोधात तक्रार केली जात असेल तर त्याची माहिती निश्चितच मुख्यमंत्र्यांना दिली गेली असणार. सध्या मख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रालय आहे. माझ्या विरोधात तक्रार दाखल करण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माझ्याकडून माहिती घेणे गरजेचे होते,” अशा भावना राजेंद्र गुढा यांनी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan minister rajendra singh gudha booked under abduction case criticizes ashok gehlot prd
First published on: 04-02-2023 at 17:49 IST