मुंबई : काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना हे तीन पक्ष प्रमुख असलेल्या ‘महाविकास आघाडी’मध्ये डावे व समाजवादी असे सहा छोटे पक्ष असून विरोधकांच्या या आघाडीत विधानसभा मतदारसंघाच्या वाटाघाटीतून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तोडगा निघू शकला नाही. परिणामी, आघाडीतील पाच छोट्या पक्षांनी तब्बल १५ मतदारसंघांत बंडखोरी कायम ठेवली आहे.

समाजवादी पक्षाला भिवंडी- पूर्व आणि शिवाजीनगर -मानखुर्द या दोन जागा ‘मविआ’ तील चर्चेदरम्यान सोडण्यात आल्या होत्या. मात्र या पक्षाने मालेगाव -मध्य, तुळजापूर, भूम -परांडा, भिवंडी- पश्चिम, धुळे शहर आणि औरंगाबद- पूर्व या मुस्लीमबहुल सहा मतदारसंघांमधील आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. माकपला डहाणू व कळवण हे दोन मतदारसंघ सोडण्यात आले. मात्र ‘माकप’ने ‘सोलापूर -मध्य’ या मतदारसंघावरील दावा कायम ठेवला.

हेही वाचा >>>माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता

● ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा’ला ‘मविआ’च्या चर्चेदरम्यान एकही जागा सोडण्यात आलेली नाही. मात्र या पक्षाने बागलाण, साक्री आणि नवापूर या तीन मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

● भाकपने १२ मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. भाकपला शिरपूर ही एक जागा सुटली होती. या पक्षाने शेवटच्या दिवशी शिरपूर वगळता सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले.

● काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मविआमध्ये एकाही जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र ‘मविआ’चे नेते या १५ जागांवरील लढती या बंडखोरी नसून मैत्रीपूर्ण लढती असल्याचे सांगत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● तीन प्रमुख पक्षांनी ‘मविआ’तील जागावाटप योग्य पद्धतीने केले नसल्याने हे पक्ष डावे राजकारण संपवत असल्याचा आरोप करत आहेत.